स्वाती नाईक, झी मिडिया, पनवेल : पनवेलमधील 300 वर्ष जुना पेशवेकालीन बापट वाडा(Bapat Wada) अखेर जमीनदोस्त झाला आहे. गौरवशाली इतिसहास असलेला हा वाडा पडताना पाहून नागरीक हळहळले. ऐतिहासिक वाड्यांमुळे पनवेल शहराची एक वेगळी ओळख मिळालेय. हा ऐतिहासिक बापट वाडा देखील पनवेल शहराची(Panvel, Navi Mumbai) शान होता. हा वाडा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार होता.
बापटवाड्याची आपली एक वेगळीच ओळख होती. वाढत्या शहरीकरणासह पनवेल शहर देखील कात टाकत आहे. वाड्यांच्या जागा टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. आता बापटवाडा देखील इतिहास जमा झाला आहे.
पेशवेकालीन बापटवाडा पनवेल पालिकेने जमीनदोस्त केला आहे. या वाडा धोकादायक स्थितीत असल्याने पालिकेने वाड्यावर बुल्डोजर फिरवला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात या वाड्यावर तोडक कारवाई करण्यात आली.
सध्या या वाड्यात 12 भाडेकरू वास्तव्यास होते. मात्र, वाडा धोकादायक झाल्याने पालिकेने दीड महिन्यापूर्वी भाडेकरूंना नोटिसा बजावली. घरे तात्काळ खाली करण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. यानंकर या वाड्यावर तोडक कारवाई करण्यात आली.
हा वाडा पेशवेकालीन आहे. चिमाजी आप्पा यांनी वसईच्या स्वारी वेळी पनवेल मध्ये हा बांधला होता. या वाड्याला जवळपास ३०० वर्ष झाली. या ऐतिहासिक वाड्यात साजरा होणारा गोकुळाष्टमीचा सण लक्षवेधी आहे. या वाड्यात कित्येक वर्षांपासून गोकुळाष्टमीचा सण साजरा होत होता.