गजानन देशमुख, झी 24 तास हिंगोली : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. गडचिरोली, चंद्रपूर भागातील काही गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसामुळे भीषण परिस्थिती आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या कुरुंदा गावात पुराचं पाणी शिरलं होतं. गावात सगळ्यांच्या घरात पाणी शिरलंय. हे पाणी गावातील बँकांमध्ये सुद्धा शिरलं होतं. या पाण्यात बँक आणि पतसंस्थेतील 12 लाख 22 हजार 500 रुपयांहून अधिक रोकड भिजली.
या बँकेतील संगणक, फाईल्स,स्टेशनरी सामान भिजून खराब झालंय. 26 कर्ज फाईल्सही भिजल्या होत्या.काही कर्जाच्या फाईल्स आणि स्टेशनरी सामानही भिजल्याची माहिती बँक अधिका-यांनी दिली.
चार सिपीयू,स्टेशनरी सामान आणि कर्जाच्या फाईली भिजल्यात. तर शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीपर्यंत पाणी पोहोचले होते,यामधील 22 हजार 500 रुपये भिजले आहेत. या बँकेतील सीपीयू, स्टेशनरी सामान, खातेदार फॉर्म, भिजून खराब झाले असून 26 कर्ज फायली सुद्धा भिजल्या होत्या, त्या फाईली प्रेस करून उपयोगात आणल्या आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पाणी शिरल्याने पैसे भिजले नसले तरी बँकेतील चार सीपीयू मात्र भिजून निकामी झाले आहेत. काही कर्जाच्या फायली आणि स्टेशनरी सामान ही भिजल असल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.