Romantic Places In Mumbai : जोडीदाराचा हात हातात घेऊन शांत निवांत ठिकाणी वेळ घालवावा असं प्रत्येकालाच वाटते. मात्र, मुंबईच्या गर्दीत हे शक्य होतच नाही. कारण, मुंबईतील पर्यटनस्थळ देखील गर्दीने गजबजलेली. लांब कुठे फिरायला जाणे शक्य नसल्याने कुणी मुव्ही पहयाला जातात. तर, कुणी कॉफी किंवा डिनर डेटला जातात. मात्र, मुंबईत असे काही छुपे समुद्र किनारे आहेत. जिथे जाण्यासाठी जास्त खर्च येणार नाही.
मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी हे मुंबईतील सर्वात फमेस समुद्र किनारे आहेत. या समुद्र किनाऱ्यावर नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यामुळे अनेकजण इथं जायला टाळतात. अशा वेळस मुंबईतील हे छुपे समुद्र किनारे बेस्ट ऑप्शन ठरु शकतात. या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी तुम्हाला प्रवास खर्चाव्यतीरीक्त इतर कोणताही खर्च येत नाही.
वर्सोवा हा समुद्र किनारा जुहू चौपाटीपासून जवळ आहे. मात्र, इथं जुहू चौपाटी इतकी गर्दी नसते. अंधेरी स्टेशनला उतरुन रिक्षाने येथे जाता याते. तसेच मेट्रो ट्रेनने गेल्यास वर्सोवा मेट्रो स्टेशनवरुन हा समुद्र किनारा जवळ आहे.
वांद्रे रेक्लेमेशन या मार्गालगत हा समुद्र किनारा आहे. येथून माहिम चौपाटी, दादर चौपाटी संपूर्ण परिसर दिसतो.
बँंड स्टॅंड हे तसे मुंबईतील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील वांद्रे किल्ल्याचा परिसर तसेच आसपासचा समुद्र किनारा सुशोभित करण्यात आला आहे. येथे ठराविक वेळेत पर्यटकांना प्रवेश दिला जातो.
कार्टर रोड हा मुंबईच्या वांद्रे परिसरात येणारा छुपा समुद्र किनारा आहे. येथे आसपास कोळी बांधवांच्या वसाहती आहेत. या किनाऱ्याभोवती कठडे बांधण्यात आले आहेत. यामुळे या समुद्र किनाऱ्यावर बसून तुम्ही जोडीदारासह वेळ घलावू शकता.
मनोरी संमुद्र किनारा हा मालाड परिसरात आहेत. मालाड स्टेशनपासून हा समुद्र किनारा तसा दूर आहे. मात्र, हा समुद्र किनारा मुंबईच्या गर्दीपासून अलिप्त आहे.
मढ हे मुंबईत छोटसं आर्यलंड आहे. या समुद्रकिनाऱ्यावर देखील पर्यटांकाची फारशी गर्दी नसते. यामुळे तुम्ही जोडीदारासोबत जाण्याचा प्लान करु शकता.
बोरीवली परिसरातील गोराई समुद्र किनारा देखील अतिशय सुंदर आहे. येथे देखील पर्यटकांची फार गर्दी नसते. जोडीदारासह छान सुंदर सूर्यास्त अनुभवयाचा असेल तर गोराई समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या.
वसई नालासोपारा परिसरात देखील छुपे समुद्र किनारे आहेत. वसईतील राजौडी, नालासोपाऱ्यातील कळंब बीच आहे देखील छुपे समुद्र किनारे आहेत.