जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?

Jain Community : जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? जाणून घेऊया जैन धर्मीयांची जीवशैली. तसेच त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य.

वनिता कांबळे | Updated: Jan 30, 2025, 11:27 PM IST
जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?  title=

Jain Dharma : जागतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक उद्योजकांची नावे आहेत. यातील अनेक उद्योजक हे जैन धर्मीय आहेत. मात्र, फक्त हे उद्योजकच नाही तर जैन धर्माचे सर्वच लोक श्रीमंत असतात. यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो? भारतातील सर्वात छोटी कम्युनिटी अर्थात लहान समुदाय असलेल्या जैन धर्माचे लोक गरीब का नसतात?  जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे. 

हे देखील वाचा... केदारनाथ मंदिराचे सर्वात मोठे न उलगडलेले रहस्य! विज्ञानाला चॅलेंज देणारे 1200 वर्षे जुनं प्राचीन मंदिर 

भारतात पारसी आणि जैन या दोन समुदयाच्या लोकांची संख्या फारच कमी आहे. जैन धर्मात कुणीही गरिब  नसते. आकडेवारीवर नजर टाकली असता भारतात जैन धर्मीय लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे. असे असले तरीही या धर्माचे लोक सर्वाधिक कर भरतात. भारताच्या, इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के इन्कम टॅक्स भरणारे लोक हे जैन धर्माचे आहेत.

गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री, शेअर मार्केट, कमॉडिटी इंडस्ट्री, एयरलाइन इंडस्ट्री, मीडिया इंडस्ट्री, रीयल इस्टेट सेक्टर अशा अनेक क्षेत्रात  जैन समाजाची लॉबी पाहायला मिळते. या समाजाचे लोक नोकरी न करता पारंपारिक व्यवसाय पुढे नेतात. व्यवसायाच्या बाबतीतलं नियोजन ते खूप लहान वयातच शिकतात. यामुळे त्यांची प्रगती लवकर होते. प्रगती झाल्यावर हाती पैसासुद्धा लवकर येतो. जैन धर्माचे लोक कोणतेही व्यसन करत नाहीत. चैनीच्या गोष्टी, पार्टी, मौज मजा यावर जैन धर्मीचे लोक पैसा खर्च करत नाही. यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पैशांची बचत होते.  आपल्याकडचा पैसा ते वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवतात. यामुळे जैन धर्मीय विविध व्यवसायाच्या माध्यमातून पैशाला पैसा जोडत राहतात.

जैन धर्मीय फक्त पैसे कमवून नाही, तर नाव कमवून, धर्म प्रतिष्ठा आणि स्वास्थ्य जपून सर्व बाजूने श्रीमंत असतात. जैन धर्माचे लोक फक्त स्वत:च्या प्रगतीवर फोकस करत नाहीत. जैन धर्मातील लोक त्यांच्या समाज बांधवांना देखील व्यवसायात प्रगती करण्यासाठी मदत करतात. यामुळेच जैन धर्मात कुणाही गरीब नाही.