सातारा / पुणे : Heavy rains in Satara and Pune : सातारा जिल्ह्यातील मायणी येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. (Rain) या पावसाचा जोरदार तडाखा बसला. भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. तर पुणे जिल्ह्यातील पूर्व भागाला वादळी पावसाने झोडपले आहे. शेतऱ्यांच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात मायणी येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने येथील बाजार पटांगणात जवळ असलेल्या एका घराची भिंत कोसळून चार जण जखमी झालेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने मायणी-विटा रस्ता आणि मायणी-कातरखटाव रस्ता बंद होता. जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मायणी येथील संपूर्ण बाजाराला मोठा तडाखा बसला. पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागाला वादळी पावसानं झोडपले असून पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील शेतकरी उत्तम कापरे यांच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. तर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली.अचानक आलेल्या या वादळी पावसानं पुरंदर तालुक्यातील नाझरे सुपे येथील शेतकरी, उत्तम कापरे यांच्या घरावरील पत्रा शेड वादळी वाऱ्यामुळे उडून गेली.
कापरे यांनी नुकतेच सुमारे दहा ते बारा लाखांचा खर्च करुन हे घरं उभं केलेले होते. डोळ्यसमोर नैसर्गीक आपत्तीमुळं घरं मोडकळीस आल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यातं अश्रू आले. घरावरील पत्रा शेड उडाल्याण शेतकऱ्याचं मोठं नुकसानं झाले आहे.