पुणे : माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू झालेल्या शेतक-यांचा संपासाठी सरकार जबाबदार आहे असं म्हटलं आहे. आज बळीराजा संकटात आहे, तो रस्त्यावर उतरलाय, तो संघर्ष करतोय, त्याला साथ देण्याची गरज आहे. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्ते शहाणपणाचा निर्णय घेतील आणि त्याचे हित जोपासण्यासाठी हातभार लावतील ही अपेक्षा आहे, असं पवारांनी पुण्यात म्हटलं आहे.
माहिला आरक्षणा लागू होण्याचा रौप्य महोत्सव आज साजरा करण्यात आला. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी शरद पवारांनी मोठं योगदान दिलं. यानिमित्तानं पवार दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.