कपिल राऊत झी मीडिया, ठाणे : भारतातली सगळ्यात पहिली हिरव्या रंगाची नंबर प्लेट असलेली अर्थात इलेक्ट्रिक चार्जिंगची ई कार ठाण्यातल्या अविनाश निमोणकर यांनी घेतलीय. ही गाडी शून्य टक्के प्रदूषण करते..... फक्त ४९ रुपयांचं चार्जिंग केल्यावर ही गाडी दीडशे किलोमीटर धावते.
भारतातली पहिली ई कार... अर्थात इलेक्ट्रिक चार्जिंग कार... अजिबात प्रदूषण न करणारी गाडी... ठाण्यातले व्यावसायिक अविनाश निमोणकर यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ही गाडी खरेदी केलीय. सगळ्यात भारी आहे या गाडीची नंबर प्लेट... हिरवी नंबर प्लेट... गाडी पर्यावरणपूरक असल्याची ग्वाही देणारी ही नंबर प्लेट...
- या गाडीमुळे शून्य टक्के प्रदूषण होतं
- ८ ते १० तास चार्जिंग केल्यावर गाडी दीडशे किलोमीटर चालते
- फक्त ४९ रुपयांचं चार्जिंग केल्यावर गाडी दीडशे किलोमीटर धावते
- डीसी फास्ट चार्जिंग स्टेशन सेंटर्सवर ४५ मिनिटांत गाडी चार्ज होते
- या गाडीची देखभाल फारशी करावी लागत नाही
- या गाडीला ना गिअर, ना इंजिन, ना ऑईलिंग....
- या गाडीला रोड टॅक्स लागत नाही
- या गाडीसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी शुल्क लागत नाही
- महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचं या गाडीसाठी जवळपास दोन लाख अडतीस हजाराचं अनुदान मिळतं
- आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे उतरण असताना आणि ब्रेक मारल्यावर ही गाडी चार्ज होते
- या गाडीची किंमत साडे दहा लाखांच्या आसपास आहे
या गाडीच्या चार्जिंगसाठी सरकार ठिकठिकाणी चार्जिंग सेंटर उभारतंय. भविष्यात अशाच हिरव्या नंबर प्लेटच्या गाड्या जास्तीत जास्त रस्त्यावर धावणं अपेक्षित आहे... चला, तुमचा प्रवास सुखाचा होवो... आणि पर्यावरणपूरकही होवो...