पुण्यात ट्रकच्या धडकेत महिला डॉक्टरचा मृत्यू

ट्रकने धडक दिल्याने एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला.  डॉक्टर अनुराधा पंतुलवार असं या डॉक्टरचं नाव आहे.  

Updated: Jul 27, 2017, 03:49 PM IST

पुणे : ट्रकने धडक दिल्याने एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला.  डॉक्टर अनुराधा पंतुलवार असं या डॉक्टरचं नाव आहे.  

मुंढवा - मगरपट्टा रस्त्यावर बुधवारी सकाळी हा अपघात झाला. अनुराधा ही भेकराईनगर हडपसर येथे राहत होती. ती मूळची नांदेडची रहिवासी आहे. हडपसरमधल्या महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात ती एमडीचं शिक्षण घेत होती. 

अनुराधा बुधवारी सकाळी मगरपट्टा सिटी  इथल्या मैत्रिणीला भेटून मगरपट्टाच्या दिशेने दुचाकीवरून कॉलेजला जात होती. मगरपट्टा सिटी मेन गेट चौकाकडून येत असताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकनं दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात अनुराधाच्या डोक्याला गंभीर मार लागला.  

यावेळी अनुराधानं हेल्मेटही घातलं नव्हतं. आजूबाजूला रहिवासी भाग नाही, त्यामुळे धडक दिलेला ट्रक पसार झाला. अनुराधा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.