Rohit Pawar ED Raid : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ED मोठा धक्का बसला आहे. ED कडून बारामती अॅग्रोची प्रॉपर्टीवर (Baramati Agro Money Laundering Case) जप्तची कारवाई करण्यात आली आहे. 161 एकर जागा ED ने जप्त केली आहे. जपवळपास 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. बारामती अॅग्रोही आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बारामती ऍग्रो लिमिटेडच्या मालकीच्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची (कन्नड एसएसके)च 50.20 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग (पीएमएलए), 2002 च्या तरतुदी अंतर्गत महाराष्ट्र राज्याने साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर विक्रीशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. कन्नड, जिल्हा- औरंगाबाद येथे 161.30 एकर जमीन, प्लांट आणि यंत्रसामग्री आणि साखर युनिटची इमारत जप्त करण्यात आली आहे. आयपीसी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. MSCB चे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी त्यांचे नातेवाईक तसेच खाजगी व्यक्तींना योग्य प्रक्रियेचे पालन न करता एसएसकेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची यापूर्वी अनेकदा ईडी चौकशी झाली आहे. मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवार यांचीही ईडी चौकशी झाली होती. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी 24 जानेवारीलाही त्यांची 12 तास चौकशी झाली होती. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक झाला होता. तर, ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
यापूर्वी बारामती अॅग्रोवर ईडीनं छापेमारी केली होती.आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ED नं छापेमारी केली होती. पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. ईडीच्या पथकाने एकूण 6 ठिकाणी धाडसत्र राबवले होते. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली होती. त्याचसोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड साखर कारखान्यावरही आयकर खात्याने छापे मारले होते.