कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. रात्री १०.२० ते १०.३०च्या दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के बसले.
या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल होती अशी माहिती मिळतेय. यासोबतच कोयना परिसरातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रात्री १० वाजुन २२ मिनिटांनी कराड परिसरातही भूकंपाचा धक्के जाणवले.