आषाढी वारी निमित्ताने चंद्रभागा नदी वाहती ठेवणार!

यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडाच सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतलाय. 

Updated: Jun 8, 2017, 08:43 AM IST
आषाढी वारी निमित्ताने चंद्रभागा नदी वाहती ठेवणार! title=

सोलापूर : यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी निर्मल करण्याचा विडाच सोलापूर जिल्हा प्रशासनानं घेतलाय. त्याचाच भाग म्हणून वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा नदी वाहती ठेवण्याचा निर्णय, जिल्हा प्रशासन तसंच राज्य सरकारनं घेतलाय. 

पंढरपुरात आषाढी  वारीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी वारक-यांच्या सोईसुविधांसंबंधी प्रशासनानं योग्य ते निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

वारी दरम्यान वारकऱ्यांसाठी ६५ एकर परिसरात २४ तास पाणी तसंच पंढरपुरात घाणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शौचालयांची पुरेशी तरतूद आणि पिण्याचं शुद्ध पाणी प्रशासन देणार आहे. 

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी यांच्यासोबत वारकरी, दिंडीकरी, फडकरी यांची प्रमुख मंडळी या बैठकीला उपस्थित होती. या बैठकीत तसा निर्णय घेतला.