रायगड : भरधाव वेगातील ट्रेलर एका घरात शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण घरच जमीनदोस्त झाले आहे. ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळे तालुक्यातील खरसई इथं शुक्रवारी रात्री ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून एक कुटूंब या विचित्र अपघातातून बचावले आहेत. महादेव नाक्ती हे आपली पत्नी आणि मुलीसह रात्री झोपण्याच्या तयारीत होते.
त्याचवेळी अचानक भरधाव वेगातील ट्रेलर त्यांच्या घरामध्ये शिरला. मात्र नाक्ती यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली. मात्र या अपघातात त्यांचं घर, संसार उद्धवस्त झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून ट्रेलर चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.