Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते.. या प्रकरणी बदलापूरात संतप्त पडसाद उमटू लागलेत.. पीडित मुलींना न्याय देण्यासाठी बदलापूरकरांनी रेल रोको आंदोलन केलंय.. तसंच संतप्त पालकांनीही शाळेबाहेर ठिय्या आंदोलन केलंय.. या घटनेच्या निषेधार्थ बदलापुरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारलाय. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक आणि मुलांना ने आण करणा-या सेविकांना निलंबित करण्यात आलंय.. तसंच कंत्राटी पद्धतीनं सुरु असलेला सफाई कामगारांचा ठेकाही रद्द करण्यात आलाय.. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणा-या पोलिस निरिक्षकाचीही बदली करण्यात आलीये.
बदलापूर लैंगिक शोषण घटनेची सखोल चौकशी केली जाईल. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी कडक नियमावली बनवण्याच्या सुचना दिल्यायत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासकडे दिली आहे. शिक्षक, पोलीस कोणीही असू दे, अशा प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकरच्या घटना खूप दुर्देवी आहेत. घटना घडू नयेत यासाठी सर्व बाबी केल्या जातील. अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी काम केले जाईल. अशा प्रकारचे गुन्हे करण्यांवर कठोर कायदे आणले जातील. जेणेकरुन असे करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याशी देखील यासंदर्भात बोललो आहे. शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेसाठी नियमावली बनवली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बदलापूर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संस्थेच्या चौकशीचे पोलिसांना आदेश देण्याच आले आहेत. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टाच चालवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
कोलकात्यात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असतानाच महाराष्ट्रातल्या रुग्णालयांतही सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना कळव्यात घडलीय. कळवा रुग्णालय परिसरात एका गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. याप्रकरणी आरोपी प्रदीप शेळकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.आज त्याला कोर्टात हजर करणार आहे .विशेष म्हणजे कळवा रुग्णालयात cctv आहेत मात्र कळवा रुग्णालयाच्या आवारात cctv नसल्याचं उघड झालंय. कळवा पोलीस या बाबत, रुग्णालय प्रशासनाला cctv लावा असं पत्र देणार आहेत.दरम्यान या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया उमटताहेत.