पेण अर्बन बॅंक घोटाळा : जप्त केलेल्या जमिनी विकून ठेवी भागविणार

 बँकेच्‍या ठेवीदारांची देणी भागवली जातील अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली . 

Updated: Feb 4, 2018, 08:13 PM IST
पेण अर्बन बॅंक घोटाळा : जप्त केलेल्या जमिनी विकून ठेवी भागविणार title=

रायगड :  कोटयवधी रूपयांच्‍या पेण अर्बन बँक घोटाळयातील जप्‍त केलेल्‍या ज्‍या जमिनी नैनामध्‍ये येतात त्या विकत घेण्‍यात येणार आहे. असे आदेश आपण सिडकोला दिले असून त्‍यातून मिळणाऱ्या पैशातून बँकेच्‍या ठेवीदारांची देणी भागवली जातील अशी माहिती राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी दिली . 

भाजपात प्रवेश 

 रायगड जिल्‍हयातील कर्जत येथे झालेल्‍या कार्यक्रमात शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी मुख्‍यमंत्रयांच्‍या उपस्थितीत भाजपमध्‍ये प्रवेश केला यावेळी मुख्‍यमंत्री बोलत होते .

'नैना'चा नकाशा 

'नैना'चा नकाशा तयार करण्‍याचे काम सुरू आहे  . त्‍याला अंतिम मंजूरी मिळाल्‍यानंतर या जमिनी सिडकोमध्‍ये समाविष्‍ट होतील असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

परंतु आश्‍वासने नको ठोस कारवाई हवी अशी भूमिका पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समितीने घेतली आहे .