छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. यानंतर छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.

नेहा चौधरी | Updated: Feb 18, 2025, 10:39 PM IST
छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकूर विकिपीडियावरुन काढला, झी 24 तासच्या मोहिमेला मोठं यश

Chhatrapati Sambhaji Maharaj :  छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विकिपिडियाचा माहितीचा स्त्रोत म्हणून वापर केला जातो. विकिपिडियावरील खोडसाळ माहितीमुळं जाणिवपूर्वक शंभूराजांच्या प्रतिमेचं हनन केलं जात असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून केला जातोय. शंभूराजांबाबतही खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी झी 24 तासनं मोहीम हाती घेतलीय. झी 24 तासनं हाती घेतलेल्या या मोहीमेला अखेरला मोठं यश आलंय. शंभूराजांबाबतचा तो खोडसाळा मजकूर हटवण्यात आलंय. झी २४ तासच्या मोहीमेनंतर सरकारनं कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर  विकिपीडियाला नोटीस बजावताच आक्षेपार्ह उल्लेख हटविण्यात आलंय.

दरम्यान आश्चर्याची बाब म्हणजे विकिपीडिया ने सदर माहितीचे जे स्रोत दिले आहेत त्यात वादग्रस्त अमेरिकन लेखक जेम्स लेन यांचाही संदर्भ देण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये अधिकच संताप होत आहे. शंभूराजांबाबतही खोटी आणि खोडसाळ माहिती काढून टाकावी यासाठी झी 24 तासनं मोहीम हाती घेतली होती. तर झी 24 तासच्या मोहीमेची सरकारकडून दखल घेण्यात आलीय. छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची राज्य सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई करणार असं, मंत्री संजय शिरसाट यांनी माहिती दिलीय. तसंच मजूकर हटवण्याबाबत तातडीने पावलं उचलली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

विकिपीडियालावरील संभाजी महाराजांबाबतचा आक्षेपार्ह मजकूर काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. झी २४तासनं सकाळी 10 वाजून 56 मिनिटांनी सर्वत प्रथम याबाबतची बातमी दाखवली होती. शंभूराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर काढण्याची मोहीमच झी २४तासनं सुरु केली होती. समजातील विविध स्तरांतून याबाबत प्रतिक्रीया घेत सातत्यानं याचा पाठपुरावाही केला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी झी 24तासच्या या मोहिमेची दखल घेतली. देवेंद्र फडणवीसांनी सायबर सेलचे IG यशस्वी यादव यांना तातडीनं मंत्रालयात बोलावून घेतले आणि विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश दिले. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल असलं लेखन खपवून घेतलं जाणार नाही यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पिता-पुत्र म्हणून असणाऱ्या संबंधांचा संदर्भ देत विकिपिडियावर वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आलेला आहे. या मजकुराचा स्क्रीनशॉट व्हायरल होत असतानाच दुसरीकडे कमरान अकमाल खानने ही माहिती पोस्ट केली आहे. 'हा इतिहास असून खरा आहे,' असा मजकूर कमाल खानने ही माहिती शेअर करताना पोस्ट केली आहे. 17 फेब्रवारी रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास कमाल अकमाल खानने ही वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे कमाल खानवर सरकार कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.