बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील

CBSE Recruitment 2025: CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 8, 2025, 02:20 PM IST
बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील title=
सीबीएसई भरती

CBSE Recruitment 2025: बारावी किंवा पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  

CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येथे काम करू इच्छिणारे कोणीही CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. CBSE च्या या भरतीद्वारे एकूण 212 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये अधीक्षक पदाच्या 142 आणि कनिष्ठ सहायकाच्या 70 पदांचा समावेश आहे. अधीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे असावे. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असावे.

कोण करु शकतो अर्ज?

अधीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराला विंडोज, एमएस ऑफिस, मोठा डेटाबेस, इंटरनेट असे संगणक आणि त्याच्या ऍप्लिकेशन्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे.कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटरवर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.अधीक्षक आणि ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 800 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.  एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/महिला/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना अर्जातून सवलत देण्यात आली आहे. 

किती मिळेल पगार?

अधीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर-6 अंतर्गत वेतन दिले जाईल. ज्युनिअर असिस्टंटसाठी पगार लेव्हल-2 द्वारे दिला जाईल.

अर्जाची शेवटची तारीख

प्राथमिक तपासणी चाचणी (OMR आधारित),मुख्य परीक्षा (वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रकार) आणि टायपिंग चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार 31 जानेवारी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा