बॉलिवूडमध्ये झळकण्याची जिद्द ठरली जीवघेणी; मुंबईतील तरुणीसोबत घडला अमानुष प्रकार

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा बाळगलेल्या एका तरुणीसोबत भयंकर प्रकार घडला आहे. तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 16, 2023, 03:56 PM IST
 बॉलिवूडमध्ये झळकण्याची जिद्द ठरली जीवघेणी; मुंबईतील तरुणीसोबत घडला अमानुष प्रकार title=
bihar fb friend breaks girl s skull after rape bid in mumbai

Mumbai News: आधी फेसबुकवर मैत्री नंतर जवळीक वाढल्यानंतर आरोपीने तरुणीसोबत केलेला आमानुष प्रकार पाहून तुमच्याही काळजाचा थरकाप उडेल. मुंबईत राहणाऱ्या तरुणीसोबत भयंकर प्रकार  घडला आहे. बिहारच्या 18 वर्षीय तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरुणीसोबत मैत्री केली. ओळख वाढल्यानंतर या तरुणीने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने आरडाओरडा केल्यामुळं त्याचा प्रयत्न फसला त्यामुळं त्याने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. वर्सोवा पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. 

वर्सोवा पोलिसांनी सूरतमध्ये एटीएम देवाण-घेवाणीच्या माध्यमातून आरोपी दीपक मालाकार याला अटक केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिल्म डायरेक्टर आणि कास्टिंग प्रोड्युसर असल्याचा दावा केला होता. पीडिता विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिकत होती. दोन महिन्यांपूर्वी आरोपी लग्नाचा प्रस्ताव घेऊन पीडितेच्या आई-वडिलांना भेटला होता. घरच्यांनीही त्यांच्या लग्नाला होकार दिला होता. त्याचबरोबर दोघांना एकत्र राहण्याची परवानगीदेखील दिली होती. 

पीडित मुलगी ही महाविद्यालयात शिकत असल्यामुळं तिने आधी शिक्षण पूर्ण करु द्यावे त्यानंतर आपण लग्न करू असं म्हटलं होतं. तसंच, मुलीला बॉलिवूडमध्ये किस्मत आजमवायची होती. तिला हिंदी चित्रपटात काम करायची इच्छा होती. दोघे एकत्र राहत असताना आरोपीने पिडीतेसोबत शारिरीक संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली मात्र तिने त्याला नकार देत त्याच्यापासून अंतर ठेवून वागू लागली. त्यामुळं मालाकार नाराज झाला होता. 

11 ऑगस्ट रोजी मालाकार सामान घेण्याच्या उद्देशाने पिडीतेला मित्राच्या घरी घेऊन गेला होता. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने विरोध केल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने तिचे डोके भिंतीवर आपटायला सुरुवात केले. तसंच, तिच्या चेहऱ्यावर वार केले. आरोपीच्या हल्ल्यात पीडिता गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. 

सुरुवातीला आरोपी मालाकार याला वाटले की तरुणीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं घाबरुन त्याने घरातून पळ काढला. मात्र जातेवेळी त्याने घराला बाहेरुन कुलूप लावले आणि शहरातून पळून गेला. जेव्हा एक तासानंतर तरुणीला शुद्ध आली तेव्हा तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. शेजारी राहणाऱ्या  नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. तेव्हा या घटनेचा खुलासा झाला आहे. 

पोलिसांनी पीडित तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. दोन दिवस आयसीयूमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला तरुणीला जीवे मारायचे होते, अशी कबुलीदेखील दिली आहे.