बडोदा बॅंक दरोडा : सराफ कारागिराला अटक, मालेगाव पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह!

बडोदा बँक लॉकर दरोडयातील सोने मालेगावात विक्री झाले. एका सराफ कारागिराला नवी मुंबई पोलीस पथकाने मालेगावातून अटक केली.  

Updated: Nov 22, 2017, 04:32 PM IST
बडोदा बॅंक दरोडा :  सराफ कारागिराला अटक, मालेगाव पोलिसांपुढे प्रश्नचिन्ह! title=

नीलेश वाघ,  मनमाड : वाढत्या घरफोड़या, चेन स्चेकिंग व् गुन्हेगारयांमुळे मालेगांव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यातच नवी मुंबईतील बडोदा बँक लॉकर दरोडयातील सोने मालेगावात विक्री झाले. एका सराफ कारागिराला नवी मुंबई पोलीस पथकाने मालेगावातून अटक केली. त्यामुळे  मालेगाव पोलीस करतात तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संवेदनशील शहर म्हणून  मालेगाव राज्यात ओळख निर्माण झालीय. शहरात  गेल्या दोन महिन्यांपासून दिवसाढवळया  चेन स्चेकिंग आणि वाढत्या गुन्हेगारी कारवाया यामुळे मालेगावची कायदा सुव्यवस्था धोक्यात आली. घरफोड्या  रोखण्यात  पोलिसांना सपशेल अपयश आले.

तर दोन दिवसांपूर्वीच नवी मुंबईच्या पोलीस पथकाने मालेगाव येवून नवी मुंबई बँक लॉकर दरोडयातील सोने खरेदी केलेल्या राजेंद्र वाघ या सराफ कारागिरास अटक  केल्याने  मालेगाव पोलिसांच्या अकार्यक्षमता पुन्हा एकदा उघड झाली.गंभीर दरोडयातील  सोन्याची मालेगावात विक्री झाली याची साधी भनक  मालेगांव पोलिसांना लागत नसेल तर मालेगाव पोलीस करतात तरी  काय असा सवाल यानिमित्ताने  विचारला जात आहे. 

या आधीही मालेगावात  गंभीर  गुह्यातील आरोपींचे वास्तव असल्याचे उघड झाले. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी ख्याती  हर्ष पोद्दार सारखे  अप्पर पोलिस अधीक्षक असतानाही मालेगाव पोलीसांच्या कामाबाबत मालेगावकर नाराज आहेत. या  सगळ्यात लवकरच बदल करत,मालेगाव पोलिसांची कार्यक्षमता वाढवी यासाठी  त्रिसूत्री कार्यक्रम आखण्यात  आला आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी व पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी  वरिष्ठ पोलीस अधिकारी  उपाय योजना करीत असले तरी पुढील काळात अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांची  मानसिकता बदलण्याचे  आणि त्यांच्याकडून काम करुन  घेण्याचे मोठे आव्हान  आहे. तसे झाले तरच मालेगांवची  पोलिसांची कार्यक्षमता  वाढणार  आहे.