निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांचा फोटो केला शेअर अन् म्हणाले....

Updated: Oct 9, 2022, 12:23 AM IST
निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... title=

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीआधी (Andheri Bypoll Election) निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवलं (Shivsena Election Symbol Bow And Arrow) आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या चिन्हावरून शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटामध्ये (Thackeray group) वाद चालू होता. आयोगाने दोन्ही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसल्याचं सांगितलं आहे. शिंदे गट निवडणूक लढवणार नाही त्यामुळे ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. अशातच यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना या निर्णयावर सडकून टीका केली आहे. (Aditya Thackerays first reaction as the Election Commission froze the symbol)

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. यासोबतच बाळासाहेब ठाकरेंसोबत उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. 

 

आदित्य ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गटाचा खोकेवाले गद्दार असा उल्लेख केला आहे. त्यासोबतच खोकेवाल्या गद्दारांनी शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केल्याचं म्हणत घणाघात केला आहे. शिंदेंच्या बंडानंतरही ठाकरेंची साथ देणारे उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी चिन्हाबाबत पोस्ट केली आहे. 

ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी, 'आमचे चिन्ह....उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं म्हटलं आहे. कट्टर शिवसैनिकांनी पाटील आणि निंबाळकर यांच्या पोस्टला प्रतिसाद दिला आहे. शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.