Aaditya Thackeray on samruddhi mahamarg: मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनावरून वाद सुरू असल्याचं पहायला मिळालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Nagpur) पहिल्या टप्प्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. लोकार्पण सोहळ्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना आमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यावरून आता शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. (aditya thackeray says no invitation for samruddhi mahamarg inaugration by pm narendra modi at nagpur marathi news)
आरेमधील सावरकर उद्यानमध्ये आदित्य ठाकरेंना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आम्हाला आमंत्रण का दिलं गेलं नाही हे सरकारला तुम्हीच विचारा, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. आरेमधील मेट्रो कारशेडला (Aare metro carshed) आमचा विरोध कायम असेल, असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.
कारशेडला किंवा मेट्रोला हा विरोध नाहीये. पण जंगलहानी करून जर कारशेड होत असेल तर आमचा विरोध असणार आहे. राजकारण्यांना लाज वाटायला हवी की अजूनही आदिवासी लोकांचा विकास झाला नाही, असं काटक वक्तव्य आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) केलं आहे.
आणखी वाचा - PM Modi : "पुढच्या वेळी पण मला....", मुख्यमंत्री शिंदेंची मोदींकडे 'ही' मागणी
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार असताना आरेमधील तब्बल 826 एकर परिसर जंगल म्हणून घोषित केली होती. इतकंच काय तर आरेतील काँक्रिटचा रस्ता आम्ही केला, असं म्हणत त्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur - Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यावेळी उपस्थित होते.