Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

Chadrapur News: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

Updated: Dec 11, 2022, 04:07 PM IST
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गानंतर विदर्भाला आणखी एक Gift; पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण  title=
chandrapur news

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचे लोकार्पण झाले. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट), चंद्रपूरच्या नव्या इमारतीचे लोकर्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. ही संस्था प्लॅस्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्लॅस्टिक अभियांत्रिकी (plastic engineering and technology) आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण आणि मनुष्यबळ विकासाचे काम करते. या संस्थेची नवी प्रशस्त इमारत ही चंद्रपूरच्या विस्तारित एमआयडीसी या भागात उभारली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरातूनच या इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण केले. आतापर्यंत 4280 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि त्यापैंकी 87% विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये या संस्थेतून रोजगार मिळाला आहे. 

संस्थेविषयी थोडसं 

सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेटरोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी (सिपेट) ही भारत सरकारच्या रसायन व पेट्रोरसायन विभाग तसेच रसायन व खते मंत्रालयाची मान्यताप्राप्त असलेली ISO 9001:2015 प्रमाणित नामांकित संस्था चंद्रपुरामध्ये कार्यरत आहे. चंद्रपूर येथे प्लास्टिक आणि संबंधित उद्योगांच्या क्षेत्रातील मानव संसाधन व कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी आणि या क्षेत्रातील उद्योगांना तांत्रिक (start ups) सहाय्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी सिपेट संस्था सुरु करण्यात आली आहे. 

कोणते कोर्स आहेत? 

पंतप्रधान मोदी यांनी आज नागपूरातून सिपेट या संस्थेचे ऑनलाईन लोकार्पण केले. सिपेट ही संस्था संपूर्ण भारतात प्लास्टिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तसेच प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मनुष्यबळ विकासाचे काम करत असून प्लास्टिक क्षेत्रातील (plastic industry) आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी प्रशिक्षण, तांत्रिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे. या संस्थेत तीन वर्ष कालावधी असलेले डिप्लोमा इन प्लास्टिक्स टेक्नोलॉजी (DPT) आणि डिप्लोमा इन प्लास्टिक्स मोल्ड टेक्नोलॉजी (DPMT) हे दोन कोर्सेस उपलब्ध आहेत. डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत तसेच विदेशात देखील बहुराष्ट्रीय प्लास्टिक उद्योग (मल्टीनॅशनल प्लास्टिक इंडस्ट्रीज) मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध आहेत. 

यशस्वी कामगिरी

तसेच सिपेट चंद्रपूरमधून कौशल्य विकास योजनांतर्गत आतापर्यंत जवळपास अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आणि 4280 त्यापैंकी 3722 म्हणजेच 87% विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत ऑटोमोबाईल, इलेक्ट्रोनिक्स (electronics), इलेक्ट्रिकल, पॅकेजिंग, मेडीकल इ. सर्वच क्षेत्रात प्लास्टिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान यांचे अनन्य साधारण महत्व आहे. चंद्रपूर व विदर्भातील विद्यार्थ्यांना सिपेटच्या माध्यमातून प्लास्टिक अभियांत्रिकी सारख्या आधुनिक व नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमातून स्वतःचे उज्वल भविष्य घडविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.