नाशिक : तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तो तोंडात टाकेल अशा कोणत्याही वस्तू जवळ ठेवू नका. यामुळे तुमच्या बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडलीयेय
फुगा गिळल्यानं अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडलीये. नाशिकच्या सिडको परिसरातील हनुमान चौकात ही घटना घडलीये.
वीर जयस्वाल असं या चिमुकल्याचं नाव आहे. फुग्यासोबत खेळत असताना त्यानं अचानक फुगा गिळला. फुगा गिळल्याचं लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचादरम्यान त्याचा मृत्यू झाला.