सहावे बोट आजार की विकृती? 'या' लोकांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

सहावे बोट असलेल्या व्यक्तींविषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहितीच नसेतील?  ही लोकं आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व सामन्यांपेक्षा वेगळे असते तसेच विषेशही असते. या विषयी सविस्तर जाणून घ्या

Updated: Feb 3, 2025, 03:39 PM IST
सहावे बोट आजार की विकृती? 'या' लोकांबद्दल माहित नसलेल्या गोष्टी title=

People with six fingers: सामान्यतः माणसाच्या एका हाताला ५ बोटे असतात.पण आपण पाहतो की काही अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्या हाताला किंवा पायाला पाचपेक्षा अधिक बोटे असतात. सहावे बोट असणे ही कोणतीही विकृती नाही. सहावं बोट असण्याला पॉलीडॅक्टिली असे म्हणतात. अंदाजे प्रत्येक 700-1,000 बाळांपैकी एक बाळ पॉलीडॅक्टिलीने जन्माला येतो , याचा अर्थ त्याच्या हाताला अतिरिक्त बोटे किंवा पायाला बोट किंवा दोन्ही अतिरिक्त असतात.

जर सहावे बोट करंगळीजवळ (लहान बोट) असेल, तर बुध पर्वताचा प्रभाव असतो. बुधाचे प्रभाव व्याक्तीला अधिक बुधिमान बनवतो. जर हे बोट अंगठ्याजवळ असेल, तर शुक्र ग्रहाचा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे व्यक्तीमध्ये कलात्मकता निर्माण होते.

सहा बोट असलेले लोक कसे असतात?

आपल्या हातापायांमध्ये सामान्यतः पाच बोटं असतात. पण, काही लोकांच्या हातात किंवा पायात सहावे बोट असते. ज्योतिषशास्त्रानुसार, सहा बोट असलेले लोक अत्यंत भाग्यवान आणि बुद्धिमान मानले जातात. असे लोक इतरांपेक्षा जास्त प्रभावशाली असतात आणि त्यांच्या कामाची पद्धतही वेगळी असते.

सहा बोट असलेल्या लोकांचे व्यक्तिमत्त्व

ज्या लोकांच्या हातात किंवा पायात सहावे बोट असते, ते लोक तल्लख बुद्धिमत्तेचे असतात. त्यांच्या विचारांची गती जलद असते आणि त्यामुळे ते विविध क्षेत्रांत यशस्वी ठरतात. या लोकांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आणि अधिक प्रभावी असते. ते प्रत्येक काम अत्यंत परिश्रमपूर्वक आणि प्रामाणिकपणे करतात.

अशा लोकांना नवीन गोष्टी शिकायला आणि अनुभवायला खूप आवडते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करण्याचीही आवड असते. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे ते कलात्मक वृत्तीचे असतात. तसेच सुंदर गोष्टींमध्ये त्यांना जास्त रस असतो. ते जीवनातील प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यावर भर देतात. अशी लोक नेहमी प्रामाणिकपणे मेहनत करून मिळवलेले पैसेच वापरतात.

हे ही वाचा: अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत

लोकांशी संबंध कसे असतात?

अशा लोकांची एक विषेश बाब म्हणजे ते इतरांच्या कामांमध्ये त्रुटी शोधण्याचा प्रयत्न करतात. यामुळे कधी कधी त्यांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. ते उत्तम टीकाकार असतात, परंतु त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे काही लोकांना त्यांना आवडत नाहीत. पण मानापासून ते अगदी सुस्वभावी असतात.

(Disclaimer: सदर लेख ज्योतिष शास्त्रावर आणि सामन्या ज्ञानावर आधारित असून झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)