Mamta Kulkarni : किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर पदावर ममता कुलकर्णी नियुक्ती आणि त्यानंतर अभिनेत्रीची हकालपट्टीमुळे ती चर्चेत आहे. अभिनेत्रीने भारतात आल्यानंतर संन्यास घेतल्यापासून अनेक वादाला तोंड फुटले आहे. अशातच ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर पदासाठी 10 कोटी दिले होते असं म्हटलं जातंय. नेमकं काय आहे यामागील सत्य लक्ष्मी नारायण आणि खुद्द अभिनेत्रीने समोर आणलंय. ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर होण्यासाठी 10 कोटी दिलेत, हा आरोप लक्ष्मी नारायण यांनी फेटाळला आहे. पण तिने काही गुरुदक्षिणा दिली असंही म्हटलंय.
तर अभिनेत्रीने आप की अदालत या कार्यक्रमात तिच्यावर जो पैसे देण्याचा आरोप लावण्यात आला, यावर स्पष्टीकरण दिलंय. महामंडलेश्वर बनवण्यासाठी तिने 10 कोटी रुपये दिले होते का? असा प्रश्न विचारल्यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘माझ्याकडे 1 कोटी रुपये पण नाहीय. जेव्हा मला महामंडलेश्वर बनवले गेले तेव्हा मला माझ्या गुरूला दक्षिणा देण्यासाठी 2 लाख रुपये उसने घ्यावे लागले.’
पुढे ममता कुलकर्णी म्हणाली की, माझे तीन अपार्टमेंट आहेत, पण ते खराब अवस्थेत आहेत. गेल्या 23 वर्षांपासून ते अपार्टमेंट बंद स्थितीत आहे. मी कोणत्या परिस्थितीतून जात आहे, ते मी तुम्हाला सांगू पण शकत नाही.
हेसुद्धा वाचा - 'मी तेव्हा व्हर्जिन होते आणि...', 'त्या' फोटोशूटवर ममता कुलकर्णीने सोडलं मौन, म्हणाली, 'मला शारीरिक संबंधांबद्दल...'
या शोमध्ये ममता कुलकर्णी हिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ममता म्हणाली, 'आता मी पूर्ण संन्यासी आहे. दुधाचे तुपात रूपांतर झाल्यावर त्याचे मूळ स्वरूप जसे परत येत नाही, त्याचप्रमाणे मीही चित्रपटांकडे न परतण्याचा निर्णय घेतला आहे. मी 23 वर्षे तपस्वी म्हणून जगले आहे.'
भारतात परतल्यासंदर्भात अभिनेत्री म्हणाली की, मी 23 वर्षांपासून भारतात आले नव्हते. माझ्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीवरील न्यायालयीन खटला आधी संपवावा, असा मी निर्धार केला होता. तरच मी भारतात पाय ठेवेन. प्रसिद्धीसाठी ममता कुलकर्णी या नावाचा या प्रकरणात वापर करण्यात आला. मी 23 वर्षे ध्यान केलं आहे. 3-3 महिने अन्न सोडलं होतं. हठयोगाचे पालन करून मी आदिशक्तीला माझ्यासमोर यायला भाग पाडलं होतं. मी आदिशक्तीला सांगितलं, तू येईपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही. मी 5 दिवस पाण्याविना राहिली. पंधराव्या दिवशी भगवतीचे दर्शन झाले, अशीही अभिनेत्रीने सांगितलं.