Vegetables in diet : भारतामध्ये खाण्याच्या सवयी कितीही वेगळ्या असल्या तरीही काही भाग वगळता इथं प्रत्येकाच्या ताटात भाजी आणि सोबतीला चपाती असतेच. रोज आपण भाजी घाईघाईत बनवतो पण हे चुकीचे आहे. भाजी करताना काही बाबींवर भरं देणं खूप गरजेच आहे. कारण भाजी करताना केलेल्या काही किरकोळ चुकांमुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. भाजी बनवण्याची पद्धत सगळ्याच्या घरात वेगवेगळी असते. पण यात काही उणिवाही असतात. काय आहेत या चुका आणि त्यावरील उपाय?
कोणतीही भाजी बनवण्याआगोदर आपण ती धुतो, स्वच्छ करतो. या दरम्यान लक्षात घेण्याची बाब म्हणजे पुन्हा पुन्हा भाज्या पाण्याने स्वच्छ करू नये. कित्येक लोक भाजी धुतात, चिरतात आणि पुन्हा धुतात. असे केल्याने भाज्यांतील पोषक तत्वे नष्ट होतात. त्यासाठी भाज्या नेहमी धुतल्यानंतर चिराव्यात. चिरलेल्या भाज्या पाण्यात सोडून देऊ नयेत. या भाज्यांचा लगेच वापर करा. आवश्यकता नसल्यास भाज्यांना जास्त बारीक चिरू नका.
आपल्यापैकी बहुतेक जण ग्रेवी घट्ट व्हावी या साठी भाज्या खूप वेळ शिजवतात. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. असे केल्याने त्या पदार्थातील पोषक तत्वे संपतात. भाज्या कमी शिजवणे हे तर घातक आहेच पण जास्त प्रमाणात शिजवण्याने देखील विपरीत परिणाम पाहायला मिळतात.
तेल हा भाजीतील खूपच महत्त्वाचा घटक आहे. आपण भाज्यांमध्ये अनेकदा पुऱ्या किंवा भजी वैगेरे तळलेलं तेल वापरतो पण तुम्हाला माहित आहे का? हे रिफाईंड तेल भाजीत वापरणे म्हणजे भयानक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे. या तेलाचे सेवन केले तर ते मधुमेह, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग, एथेरोस्क्लेरोसिस, लठ्ठपणा, प्रजनन समस्या आणि रोगप्रतिकारक समस्या यासारखे अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे शुद्ध तेलाचाच वापर करावा. काही आहारजत्ज्ञांच्या मते प्रत्येक भाजीसाठी एकाच प्रकारच्या तेलाचा वापर करू नका. वेगवेगळ्या भाज्यासाठी वेगवेगळ्या तेलाचा वापर करावा.
काही भाज्यांचा रस्साच त्या भाजीपेक्षा जास्त आवडतो. पण त्यासाठी जास्त पाणी घातल्याने भाज्यांचा कस कमी होतो. त्यामुळे ज्या भाज्या वाफेत शिजतील त्यात जास्त पाणी घालू नका.