Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी

How to Make Egg Fried Rice: स्ट्रीट स्टॉलवर मिलणारा एग फ्राइड राईस अनेकांना आवडतो. हाच राईस तुम्ही घरी अगदी सहज बनवू शकता.   

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 4, 2024, 12:18 PM IST
Egg Fried Rice Recipe: घरच्या घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस, नोट करा सोपी रेसिपी  title=
Photo Credit: @srinidhi_hebbur/ Instagram

Street Style Egg Fried Rice: हिवाळा सुरु झाला की आवर्जून अंडी खाल्ली जातात. हिवाळ्यात आरोग्याला अंडी फार लाभदायक असतात. अनेकांना नाश्त्यात अंडी खायला आवडतात. अंड्याच्या अनेक डिशेस बनवल्या जातात. आज आम्ही तुमच्यासाठी एक दक्षिण आशियाई डिश घेऊन आलो आहोत जी केवळ स्वादिष्टच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. आज आम्ही तुम्हाला एग फ्राईड राईसची रेसिपी सांगणार होणार. ही अशी डिश आहे जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. हा एक उत्तम नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाचा पर्याय असू शकतो. अनेकांना स्ट्रीट स्टॉलवर मिलणारा एग फ्राइड राईस आवडतो. यामुळेच आम्ही तुम्हाला स्ट्रीट स्टाईल एग फ्राइड राईस कसा बनवायचे ते सांगणार आहोत. 

लागणारे साहित्य 

 

  • 2 कप शिजवलेला भात (थंड केलेला)
  • 2 अंडी
  • 1 कांदा (बारीक चिरलेला)
  • 2 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
  • 1/2  कप गाजर (बारीक चिरून)
  • 1/4 कप वाटाणे
  • 1/4 कप स्वीट कॉर्न
  • 2 चमचे सोया सॉस
  • 1 टेबलस्पून ऑयस्टर सॉस
  • 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
  • चवीनुसार मीठ
  •  तेल

हे ही वाचा: थंडीत प्या गरमागरम कडक चहा, घरच्या घरी बनाव स्वादिष्ट मसाला चहाची पावडर; जाणून घ्या रेसिपी

जाणून घ्या कृती 

 

  • सर्व प्रथम कढईत तेल गरम करा. त्यात कांदा आणि लसूण घालून सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्या. 
  • छान परतून झल्यावर आता त्यात गाजर, मटार आणि स्वीट कॉर्न घालून २-३ मिनिटे परतून घ्या.
  • नंतर एका भांड्यात अंडी फोडून नीट फेटून घ्या. 
  • यानंतर पॅनमध्ये ही अंडी घाला आणि हळूहळू ढवळत असताना अंडी स्क्रॅम्बल करा.
  • आता त्यात शिजवलेला भात घालून मिक्स करा.
  • सोया सॉस, ऑयस्टर सॉस, काळी मिरी पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.
  • यानंतर, गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये गरम एग फ्राईड राइस  काढा. त्यावर तुम्ही हिरव्या कांदा घालून छान सजवू शकता.