Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत

ऑर्डर घ्यायला नकार दिला म्हणून ग्राहकाला मारहाण करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपावरून बंगळुरूच्या डीसीपींनी ही कारवाई केली आहे.

Updated: Mar 11, 2021, 03:04 PM IST
Zomato : महिलेला मारहाणीच्या आरोपावरून झोमॅटो डिलिव्हरी बॉय अटकेत title=

मुंबई : ऑर्डर घ्यायला नकार दिला म्हणून ग्राहकाला मारहाण करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेवर हल्ला केल्याच्या आरोपावरून बंगळुरूच्या डीसीपींनी ही कारवाई केली आहे.

हितेशा चंद्राणी या तरूणीने सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करत आरोप केलेला की, ऑर्डर स्वीकारायला नकार दिला म्हणून झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने तिच्या नाकाला मारहाण केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by HITESHA | Beauty Influencer (@hiteshachandranee)

 

 

हितेशाने सांगितल्यानुसार ही ऑर्डर उशिराने तिच्याकडे पोहोचली होती. त्यामुळे एक तर ही ऑर्डर रद्द करा किंवा मला कॉम्प्लिमेंट्री म्हणून द्या, अशी मागणी हितेशाने केली. 9 मार्चला दुपारी साडे तीन वाजता हितेशाने ऑर्डर दिलेली.

मात्र ही ऑर्डर यायला 4:30 वाजले. ऑर्डर वेळेत आली नाही म्हणून हितेशाने कस्टमर केअरला फोन लावला. ऑर्डर रद्द करा किंवा मला त्याचे पूर्ण पैसे परत करा, असं तिने कस्टमर केअरला सांगितलं.

त्याचवेळी डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन हितेशाकडे पोहोचला. मात्र हितेशा कस्टमर केअरच्या प्रतिसादाची वाट पाहात होती. जेव्हा तिने डिलिव्हरी बॉयला याबाबत कल्पना दिली, तेव्हा तो तिच्यावर ओरडायला लागला आणि ऑर्डर परत घेऊन जायला नकार दिला, असा आरोप हितेशाने केला आहे.

त्यानंतर हितेशाने त्याला थोडी वाट बघायला सांगितली, तेव्हा डिलिव्हरी बॉय जबरदस्ती तिच्या घरी शिरला आणि तिच्या चेहऱ्यावर बुक्का मारला, असंही हितेशाने व्हीडिओमध्ये म्हटलंय. याप्रकरणी व्हीडिओ केल्यानंतर झोमॅटोने हितेशाची माफी मागितली आहे.