मुंबई: ZEEL झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड आणि सोनी पिक्चर्स यांनी एकत्र येण्याची घोषणा केल्यानंतर इनवेस्कोने या करारत मध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. इनवेस्को कोणाच्या हातातील कटपुतली आहे? त्यांचा हेतू काय आणि त्याची पारदर्शकता सर्वांसमोर येत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड (ZEEL) च्या बाबतीत इनवेस्कोने केलेल्या कृतीमुळे स्वत:च अडचणीत येऊ लागला आहे. केवळ कॉर्पोरेट उद्योगाच्या नेत्यांनाच ZEEL चे नेतृत्व पुनीत गोयंका यांनी करावे असे वाटत नाही. तर याउलट आता बॉलिवूडच्या दिग्गजांनीही पुनीत गोयंका यांना पाठिंबा दिला आहे.
इनवेस्को अनेक दिवसांपासून ZEEL-SONY यांच्यात झालेल्या डीलसाठी विरोध करत आहे. या डीलविरोधात षड्यंत्र आखण्याच्या तयारीत आहे. या करारात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहे. पण, इनवेस्कोच्या मागे काही मोठे कॉर्पोरेट हाऊस असल्याचे संकेत आहेत.
इनवेस्को सतत ZEEL च्या बोर्डात होणाऱ्या बदलांविषयी बोलत आहे. काही मीडिया हाऊसेसही ZEE ला प्रश्न विचारत आहेत. इनवेस्कोने आतापर्यंत या प्रकरणात कोणतीही पारदर्शकता दर्शविली नाही. त्याचबरोबर ZEEL चे संस्थापक डॉ.सुभाष चंद्र यांनीइनवेस्कोच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर लवकरच, बॉलीवूडचे दिग्गज झी एंटरटेनमेंटच्या समर्थनासाठी पुढे आले आणि पुनीत गोयनका यांना कंपनीचे एमडी-सीईओ म्हणून पुढे राहण्यास सांगितले.
बॉलिवूडचे दिग्गज निर्माता-दिग्दर्शक सुभाष घई, जे शोमन म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांनी ट्विट केले- 'चीनमधील एक छोटा गुंतवणूकदार भारतीय कंपनी ZEECorporte ला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे. डॉ.सुभाष चंद्रा यांनी 30 वर्षांत केवळ भारतीय सामग्रीच्या आधारे तयार केलेली कंपनी. मीडिया जगात संपूर्ण नैतिकतेसह चालते. घई यांना विचारले की कॉर्पोरेट संस्कृतीसाठी हा चुकीचा संकेत नाही का?
I wonder if small investors from China can shake an indian company like @ZEECorporate built by indian promotors @subhashchandra since 30 years with purely indian content ethos n ethics wid excellent status in media world
Is it giving a wrong signal to future corporate culture?
— Subhash Ghai (@SubhashGhai1) October 6, 2021
Zee which was first Indian channel promoted by Indian nationalist @subhashchandra always supported & nurtured Indian entertainment sector now hounded by American and Chinese investors.Pray Zee Entertainment remains in original Indian entrepreneur’s passionate hands @punitgoenka
— Boney Kapoor (@BoneyKapoor) October 5, 2021
Zee is the first Indian channel and has provided tremendous support to the indian entertainment industry .Today American and Chinese investors are trying to poach it.Hope Zee remains in original passionate hands. @subhashchandra @punitgoenka @PMOIndia #bycottchina
— satish kaushik (@satishkaushik2) October 5, 2021
ZEE TV,first Indian channel cultivated by @subhashchandra to India’s biggest entertainment company has always been pioneer in Indian content.I wish that it continues to progress under the leadership of @punitgoenka & an all Indian Management and pray for a great future for them.
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) October 6, 2021
ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर यांनी ट्विट केलं की 'झी हे देशातील पहिले भारतीय वाहिनी आहे, ज्याची स्थापना भारतीय राष्ट्रवादी डॉ.सुभाष चंद्र यांनी केली आहे. ज्यांनी नेहमीच भारतीय मनोरंजन क्षेत्राला समर्थन दिले आणि पुढे नेले. आता या कंपनीला अमेरिका आणि चिनी गुंतवणूकदार अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. झी एंटरटेनमेंट नेहमी पुनीत गोएंका सारख्या उत्कट आणि भारतीय उद्योजकाच्या हातात असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.