Indian Railway : भारतीय रेल्वेचे जाळे संपूर्ण देशातत पसरले आहे. अगदी दुगर्म भागातील खेडी देखील भारतीय रेल्वेमुळे एकमेकांना कनेक्ट झाली आहेत. भारतीत काही रेल्वे स्थानके त्यांच्या सौंदर्यामुळे प्रसिद्ध आहेत. झारखंड राज्यातील एक रेल्वे स्थानक विचित्र कारणामुळे चर्चत आहे. या रेल्वे स्थानकात भूत असल्याचा दावा स्थानिक करतात. तब्बल 56 वर्षांपासून या रेल्वेस्थानकात भूत असल्याची अफवा पसरली आहे. यामुळे भूत शोधा 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवा अशी ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
झारखंडच्या सीमेवर असलेल्या पश्चिम बंगाल सायन्स फोरमच्या पुरुलिया जिल्हा शाखेने हे 50 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे. रांची रेल्वे विभागातील झाल्डा येथील बेगुनकोदर स्थानकात भुताकटी असल्याची येथील ग्रामस्थांमध्ये अफवा आहे. जवळपास 56 वर्षांपासून स्थानकात भुताटकीची अफवा पसरलेली आहे.
मागील 56 वर्षांपासून हे रेल्वे स्थानक रहस्यमयी रेल्वे स्टेशन बनले आहे. या रेल्वे स्टेशनवर कार्यरत असलेले स्टेशन मास्तर बैद्यनाथ सरकार यांनी सर्वप्रथम ही अफवा पसरवली. स्टेशन मास्तर बैद्यनाथ सरकार यांच्या चार मुलींचा विनयभग झाला. त्यांना या रेल्वे स्थानाकातून दुसरीकडे बदली पाहिजे होती. मात्र, त्यांना बदली देण्यात आली नाही यामुळेच त्यांनी भुताची अफवा पसरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बेगुनकोदर पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आणि शिक्षक परमेश्वर कुमार आणि शंकर कुमार यांनी केला आहे.
भुताटकीच्या अफवेमुळे हे रेल्वे स्थानक अनेक वर्षांपासून बंद आहे. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या रांची विभागाच्या या स्थानकाच्या पुढे बामनिया नावाचे गाव आहे. हे गाव बेगुनकोदरच्या हद्दीत येते. यामुळे या रेल्वे स्थानकाचे नाव बेगुनकोदर असे ठेवण्यात आले. 1960 पर्यंत हे रेल्वे स्टेशन बनून तयार झाले. स्टेशन तयार झाल्यानंतर स्टेशन परिसर हा निर्मनुष्य होता. स्टेशन मास्तर व्यतिरिक्त आणखी एक कर्मचारी येथे राहत होता. सकाळी आणइ रात्री अशा दोनच वेळेत येथे ट्रेन थांबतात. मात्र, सुरुवातील भुताच्या अफवेमुळे येथे रेल्वे थांबत नव्हत्या. वर्षानुवर्षे रेल्वे स्थानक बंद होते. अखेरीस 2007 मध्ये स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले. यानंतर येथे दिवसा रेल्वे थांबू लागल्या. यानंतर भुताकटी अफवा असल्याचे रेल्वे प्रशासनाने सिद्द केले. यानंतर आता या रेल्वे स्थानकात रात्री देखील रेल्वे थांबत आहेत.
या रेल्वे स्थांनकात सध्या रेल्वे थांबत असल्या तरी रेल्वे स्थानकाबाबत पसरलेली भुताटकीबाबतची अफवा कायम आहे. आजही या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भुताटकीची दहशत आहे. यामुळेच भूत शोधा 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळवा अशी ऑफर पश्चिम बंगाल सायन्स फोरमच्या पुरुलिया जिल्हा शाखेने जाहीर केली आहे.