2025 मध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होणार?

New Rules From 2025:  नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून काही बाबतीत तुमचा खिसा हलका होणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Dec 31, 2024, 09:52 PM IST
2025 मध्ये तुमच्या आयुष्यात काय बदल होणार? title=
2025 मध्ये नवे नियम

New Rules From 2025:  नवं वर्षाचं हर्षोल्हासात आपण स्वागत करतोय.सरत्या वर्षाला निरोप देत, नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करतोय.पण नव्या वर्षात काही महत्वाचे बदल होणारेय.यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून काही बाबतीत तुमचा खिसा हलका होणार आहे...नेमके काय बदल होणारेत, जाणून घेऊया. 

नवीन वर्ष, नव्या आशा, नवी स्वप्न घेऊन येतं. त्याचसोबत आपल्या दैनंदीन जीवनात काही बदलही घेऊन आलंय. 2025मध्ये आपल्या खिशावर काहीसा भार पडणार आहे.काही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणारेत तर काही आर्थिक बदलही होणार आहेत.वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतला जातो. निवडणुका संपल्यानं एलपीजी दरवाढीची शक्यता आहे.नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या, मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार आहेत.  तसेच करदात्यांना कठोर GST नियमांचं पालन करावं लागू शकतं. करदात्यांना मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू होऊ शकतात. जानेवारीपासून युपीआय व्यवहारची कमाल मर्यादा 10हजार होणार आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसंबधी बदल पाहायला मिळतील. ईपीएफ सदस्यांसाठी एटीएम सुविधा मिळणार आहे.  नोंदणी असलेल्या 7 कोटींहून अधिक कर्मचा-यांना फायदा होणार आहे. डेबिट कार्डप्रमाणे एटीएममधून पीएफ काढण्याच्या सुविधेवर काम सुरू आहे. 2025 मध्ये शेतकऱ्यांसाठी खूषखबर आहे. RBI कडून कर्ज देण्याची मर्यादा वाढणार आहे. शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्जाची मर्यादा 2 लाख रुपये होणार आहे.

रेशन कार्डसाठी ई-केवायसी आवश्यक असणार आहे. नव्या वर्षात ई-केवायसी अनिवार्य  आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसलेले रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. 2025 मध्ये BSE आणि NSE संदर्भातील बदललेले नियम तुम्हाला माहिती असायला हवेत. 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्सची मासिक एक्स्पायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल. 

2025 मध्ये कारच्या किंमती वाढणार आहेत. मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा, कियाच्या कार महागणार आहेत. मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू लक्झरी ब्रँडच्या कारच्या किंमती 2 ते 4 टक्क्यांनी वाढवणार आहेत. 

नव्या वर्षाची सुरूवात आयुष्यात बरचं काही नवीन घेऊन येते.यंदाचं नवं वर्ष काही आर्थिक बदल, आर्थिक भार ही घेऊन आलाय.त्यामुळे नवं वर्ष सुकर जाण्यासाठी हे नवे नियम नक्की जाणून घ्या.