Trending: नाग-नागिनचा हनिमून रोमान्स तुम्ही कधीच बघितला नसेल, पाहा VIDEO

Trending viral video: सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक नाग आणि नागिन चक्क रोमान्स (Romance) करताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे (Snakes Mating) अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.  

Updated: Jan 5, 2023, 03:37 PM IST
Trending: नाग-नागिनचा हनिमून रोमान्स तुम्ही कधीच बघितला नसेल, पाहा VIDEO title=

Viral Video : साप म्हटलं की लोकांच्या मनात भीती निर्माण होते. मात्र नागपंचमीच्या (Nag Panchami 2023) दिवशी या नागाची पूजा (Nag puja) केली जाते. तर दुसरकडी प्रत्येक व्यक्तीचं एक खासगी आयुष्य असंत. ज्यात ते आपल्या जोडीदाराच्या अगदी जवळ असतात. अशाचं प्रकारचं प्राणी पक्ष्यांमध्येही त्यांची प्रायव्हेट लाईफ (Private Life) दिसून येते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नाग आणि नागिन चक्क रोमान्स करताना दिसत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर नाग-नागिणीचे (Snakes Mating) अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ  इंटरनेटवर तुफान व्हायरल(Video Viral) झाला आहे. यावर हजारो लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by gunjan kapoor (@gunjankapoor123)

पार्किंगमध्ये नाग-नागिणींचं रोमान्स 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या @gunjankapoor123 अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नाग आणि नागिणीची जोडी एकमेकांना आलिंगन घेत आहेत. हे अगदी रोमांचक दृष्य क्वचितच तुम्ही पाहिलं असेल.  व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की पार्किंगमध्ये (Parking video ) कसे साप स्वतःला गुंडाळून रोमान्स करत आहेत. या व्हिडीओमधील नाग-नागिण जवळपास 8 फूट लांबीचे आहेत असं दिसतं. या व्हिडीओमध्ये नाग आणि नागिणीचं एक अनोख प्रेम पाहिला मिळतं. महाराष्ट्रातील काही भागात या नाग-नागिणीच्या या दृष्याला फळण, जुळण असंही म्हटलं जातं.  या व्हिडीओला आतापर्यंत असंख्य यूजर्सने वारंवार पाहिला आहे. तसेच या व्हिडिओवर कमेंट्सचा देखीव वर्षाव होत आहे.  मात्र, हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबद्दल काहीच माहिती समोर आलेली नाही. 

वाचा : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान आता...., जय शहांनी केली घोषणा  

नाग-नागिणीच्या मिलनाबाबत गैरसमज

हिंदी चित्रपटात नाग-नागिणीचे अनेक दृश्य दाखवले जातात.  नाग-नागिणीच्या मिलन हे प्रत्यक्षात पहायला मिळणे हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो. नाग-नागिणीच्या मिलनाबाबत अनेक समज गैरसमज आहेत. सापांचं मिलन पाहिल्यानं धनलाभ होतो असा समज आहे. मात्र, हा चुकीचा समज असल्याचं सर्पमित्रांचे म्हणणे आहे.