धक्कादायक! मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर 10 ते 12 कुत्र्यांचा हल्ला, ते मदतीसाठी ओरडत होते पण... दुर्देवी मृत्यू

देशभरात भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत चालली आहे. आज मॉर्निंग वॉकला आलेल्या एका वृद्धावर दहा ते बारा कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.

Updated: Apr 16, 2023, 02:06 PM IST
धक्कादायक! मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्धावर 10 ते 12 कुत्र्यांचा हल्ला, ते मदतीसाठी ओरडत होते पण... दुर्देवी मृत्यू title=
संग्रहित फोटो

Street Dog Attack: देशभरात भटक्या कुत्र्यांने (Strey Dog) हल्ला करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात लहान मुलांवर कुत्र्याने हल्ला (Dog Attack) केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण आता एका वृद्धावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकला (Morning Walk) आलेल्या एका वृद्धावर दहा ते बारा कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्यांनी वृद्धाचे अक्षरश: लचके तोडले. तो वृद्ध मदतीसाठी ओरडत होता, पण त्याच्या मदतीला कोणीच आलं नाही. अखेर त्या वृद्धाचा जागीत मृत्यू झाला. (Dogs bite old man)

उत्तर प्रदेशमधल्या अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिंटी पार्कमधली ही घटना आहे. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. कुत्र्यांनी वृद्धाच्या कपडेही फाडून टाकले. अचानक झालेल्या हल्ल्याने वृद्ध जमिनीवर कोसळला. यावेळी कुत्र्यांनी त्यांच्या अंगावर ठिकठिकाणी चावे घेतले. यात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी सात वाजण्याच्या दरम्याची ही घटना आहे. 

सफदर अली असं या 65 वर्षीय वृद्धाचं नाव असून ते मेडिकल रोड परिसरात राहात होतेत. त्यांना दोन मुली असून दोघींचीही लग्न झाली आहेत. सफदर अली आपल्या लहान मुलीकडे राहायला आले होते. ते दररोज मॉर्निंग वॉकला जायचे. रविवारी सकाळी देखील ते नेहमीप्रमाणे  युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये मॉर्निंग वॉकला आहे. 

मॉर्निंग वॉक करत असताना दहा ते बारा भटक्या कुत्र्यांनी सफदर अली यांच्यावर अचानक हल्ला केला. यात सफदर अली यांचा जागीच मृत्यू झाला. युनिव्हर्सिटीच्या सुरक्षा रक्षकाला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच सिविल लाईन्स पोलिसांनी घटनास्थळ पोहोचत मृतदेह पोस्टमार्टोमसाठी पाठवून दिला. यानंतर पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची तपासणी केली. यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सफदर अली यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. 

हैदराबादमध्ये 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. प्रदीप असं या मुलाचं नाव होतं, हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं होतं. प्रदीपचे वडील गंगाधर हे सिक्युरीटी गार्डमध्ये काम करतात. ते आपल्या मुलाला कामच्या ठिकाणी घेऊन गेले होते. वडील काम करत असल्याने प्रदीप वडीलांपासून काही अंतरावर मोकळ्या जागेत खेळत होता. यावेळी अचाकन पाच ते सहा भटक्या कुत्र्यांनी प्रदीवर हल्ला केला. या हल्ल्यात प्रदीप गंभीर जखमी झाला. पण रुग्णलयात उपचार सुरु असताना प्रदीपचा दुर्देवी मृत्यू झाला.