महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवायचे पतीचे 2 मित्र! पती सौदीमध्ये बसून पाहायचा Video; कारण...

UP Man Allowed Friends To Rape Wife: एक दोन वेळा नाही तर मागील तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरु होता. या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 10, 2025, 09:14 AM IST
महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवायचे पतीचे 2 मित्र! पती सौदीमध्ये बसून पाहायचा Video; कारण... title=
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही (प्रातिनिधिक फोटो)

UP Man Allowed Friends To Rape Wife: उत्तर प्रदेशमधील बुंदेरशहर येथील एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. पतीने त्याच्या दोन मित्रांना आपल्या बालात्कार करु दिल्याचा खळबळजनक आरोप या महिलेने केल्याचं वृत्त आहे. या महिलेने स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मागील तीन वर्षांपासून माझ्या पतीचे मित्र माझ्यावर वारंवार बलात्कार करत असल्याचं या महिलेने पोलिसांना सांगितलं.

पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवण्याची परवानगी देण्यासाठी घ्यायचा पैसा

या पीडित महिलेने, मी एका महिन्याची गरोदर असून माझा पती सौदी अरेबियामध्ये काम करतो, असंही पोलिसांना सांगितल्याचं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटलं आहे. या महिलेने केलेल्या आरोपानुसार, मित्रांना माझ्यावर बलात्कार करुन देण्याच्या मोबदल्यात पती त्यांच्याकडून पैसे घेत होता. मित्राच्या पत्नीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी हे दोघेजण त्याला सतत पैसे देत होते, असा या महिलेचा आरोप आहे. तसेच आपण याबद्दल पतीला सांगितलं असता त्याने कुठेही याबद्दल वाच्यता न करण्याचा सल्ला दिला होता, असंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. 

व्हिडीओ करायचे आणि तो...

महिलेने केलेल्या आरोपानुसार, तिच्याबरोबर शरीरसंबंध ठेवतानेच क्षण हे दोन्ही आरोपी त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचे. त्यानंतर हा व्हिडीओ ते महिलेचा पतीला पाठवायचे. महिलेचा पती सौदी अरेबियामध्ये पत्नीबरोबर मित्र शारीरिक संबंध ठेवत असल्याचे व्हिडीओ मोबाईलवर पाहायचा, असंही पीडितेच्या तक्रारीत म्हटलं आहे. या महिलेने 2010 साली आरोपी पतीबरोबर लग्न केलं असून दोघांना चार मुलं आहेत.

सर्वात आधी कधी घडला हा प्रकार

आरोपी पती हा सौदी अरेबियामध्ये वाहनांचा मेकॅनिक म्हणून काम करतो. तो वर्षातून एकदा किंवा दोनदा घरी येतो. तीन वर्षांपूर्वी आरोपी भारतात सुट्टीनिमित्त आलेला असताना त्याने त्याच्या पत्नीबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याच्या दोन मित्रांना परवानगी दिली. मात्र पती सौदीला निघून गेल्यांतरही वरचेवर पतीचे मित्र या महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याच्या घरी यायचे.

...मी शांत बसले कारण

"सौदी अरेबियामध्ये बसून माझा पती माझ्याबरोबर त्याचे मित्र लैंगिक संबंध ठेवत असल्याचे व्हिडीओ पाहायचा. माझ्या मुलांसाठी मी शांत राहिले. पतीने मला घटस्फोटाची धमकी दिली होती," असं पीडितेने म्हटलं आहे. या साऱ्या प्रकाराबद्दल पीडितेच्या माहेरच्या लोकांना नुकतेच समजल्याचं पीडितेच्या भावाने सांगितलं आहे. पीडिता आणि तिच्या पत्नीचा वाद झाल्यानंतर पत्नीने हिंमत करुन तक्रार दाखल केल्याची माहिती तिच्या भावाने दिली आहे. पोलिसांनी अद्याप आरोपी पती आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केलेली नाही. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.