Petrol-Diesel Price Today 12th september : गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरावर दिसत नाही. सुमारे साडेतीन महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol-diesel) वाढत्या किमतीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, सरकार दर 15 दिवसांनी कच्चे तेल डिझेल-पेट्रोल आणि विमान इंधन (ATF) वर लागू केलेल्या नवीन कराचा आढावा घेईल.
क्रूड मध्ये घसरण सुरूच
यापूर्वी 22 मे रोजी तेलाच्या किमतीवरील उत्पादन शुल्क कमी करून सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. सोमवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 86.05 आणि ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 92.19 पर्यंत घसरली.
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेल दर पाहा
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर