नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ३ दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांना वैयक्तिक निमंत्रण दिलंय. स्वातंत्र्य दिनाला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात हे ३ कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत. कोरोना वॉरियर म्हणून यांची ओळख दिली जाणार आहे. यामधील एसआय सुनीता मान या दिल्लीतील एक लोकल पोलीस स्थानक मैदानात तैनात असतात. हेड कॉंस्टेबल (AWO) मनीष कुमार हे द्वारका जिल्ह्यात ड्यूटीवर आहेत. तर कॉंस्टेबल जितेंद्र हे रोहिणी जिल्हातील पोलीस स्थानकात ड्युटीवर आहेत.
एसआय सुनीता मान या २४ तास फ्रंट लाईन कोरोना योद्धा म्हणून कार्यरत आहेत. त्यांना कोरोना संकटाचा सामना करावा लागतोय. तरीही त्या सर्वांमध्ये जागृकता निर्माण करतायत. आपल्या ड्युटीसोबतच त्या गरजू, भुकेलेल्यांना जेवणाचे पॅकेट्स देतात. टेस्टिंग दरम्यान सुनीता सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतात. कठीण काळात माणुसकी दाखवण हे सामाजिक जबाबदारी आहे.
हेड कॉंस्टेबल जितेंद्र हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मजुरांना जेवण वाटप करतात. कोरोनाच्या कठीण काळात आराम न करता ते नागरिकांची सेवा करतात. या कठीण काळात विद्यार्थी, पर्यटक आणि स्थलांतरित कामगारांसाठी निरंतर प्रयत्न करत आहेत.
हेड कॉंस्टेबल (AWO) मनीष कुमार हे कोरोना लॉकडाऊन काळात कर्तव्यनिष्ठेसह जबाबदारी पार पाडत आहे. त्यांनी गरजुंसाठी सार्वजनिक जेवणाची व्यवस्था चालवण्यात महत्वाची कामगिरी बजावली. दररोज ते ८०० भुकेलेल्यांना जेवण देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात अशा कामाचा उल्लेख केला होता.