मुंबई : Tata Tiago iCNG and Tigor iCNG Launch : टाटा मोटर्सने अखेर CNG क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. कंपनीने बुधवारी आपल्या प्रसिद्ध कार टिगोर आणि टियागोच्या सीएनजी वेरिएंटला लॉंच केले आहे. दोन्ही कार iCNG टेक्नॉलॉजीवर आधारीत आहे. Tiago iCNG ची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपये आहे. तसेच Tigor iCNG ची एक्स शोरूम किंमत 7 लाख 69 हजार इतकी आहे.
डायरेक्ट सीएनजी मोड स्टार्ट
कंपनीचे म्हणणे आहे की, दोन्ही कारची कामगिरी पेट्रोल कारसारखीच दमदार आहे. दोन्ही कारमध्ये ही विशेष बाब आहे की, तुम्ही थेट सीएनजी मोडमध्ये कारला स्टार्ट करू शकता. कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे इंजिन आहे. हे एडवान्स इंजिन असून चढतीही आरामात चढू शकते.
कारच्या किमती किती?
टाटा टियागोची सीएनजी कार तुम्ही मिडनाइट लॅम्प, एरिजोना ब्लू, ओपल व्हाइट, फ्लेम रेड आणि डे टोना ग्रे या रंगात खरेदी करू शकता.
तसेच टिगोर सीएनजी मॅग्नेटिक रेड, एरिजोना ब्लू, ओपल व्हाइट, डे टोना ग्रे आणि डीप रेड रंगात खरेदी करता येईल.