'या' बँकेची उद्यापासून ATM सेवा बंद, एटीएम शिवाय कसे करणार पैसे विड्रॉल?

पैसे काढण्यासाठी ग्राहकांसमोर नवा पर्याय 

Updated: Sep 30, 2021, 12:18 PM IST
'या' बँकेची उद्यापासून ATM सेवा बंद, एटीएम शिवाय कसे करणार पैसे विड्रॉल? title=

मुंबई : सूर्योदय स्मॉल फाइनेल बँकेने ग्राहकांना मोठी माहिती दिली आहे. बँकेने आपल्या ऑटोमेटेड टेलर मशीन्स म्हणजे एटीएम (ATM) ला बंद केलं आहे. बँकेने आपल्या वेबसाईटवर याबाबतची माहिती दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद केली जाणार आहे. 

सूर्योदय स्मॉल फायनॅन्स बँकेने आपल्या वेबसाइटवर याबाबत अधिकृत माहिती दिल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ झाला आहे. एटीएमसेवा बंद केल्यामुळे पैसे अकाऊंटवरून कसे काढायचे हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. 

दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून करू शकता विड्रोल 

ग्राहक सूर्योदय बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डचा वापर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये त्याच्या रोख रक्कम काढण्यासाठी करू शकते. बँकेने सांगितले की ग्राहक इतर बँकिंग सेवांसाठी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (24X7) वापरू शकतात.

गेल्या महिन्यात, शेअरहोल्डर्सना दिलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालात, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि टिफ कार्यकारी अधिकारी भास्कर बाबू म्हणाले की, बँक त्याच्या धोरणात्मक सहयोगांचा वापर करून एक स्टॉप सोल्यूशन बँक बनण्याची इच्छा आहे. 

बाबू म्हणाले होते की, पुढील तीन वर्षांसाठी त्यांचे मुख्य ध्येय त्यांच्या सर्वसमावेशक ग्राहकांसाठी आर्थिक ताकद विकसित करणे आहे. सूर्योदय स्मॉल फाइनान्स बँक लिमिटेड एक शेड्युल कर्मशिअल बँक आहे. त्यांनी आपल्या कामाची सुरूवार NBFC म्हणून केली आहे. सूर्योदयने 2017 मध्ये SFB च्या रुपात आपलं काम सुरू केलं आहे. बँकेचे देशभरात 555 बँकिंग आऊटलेट असून 13 राज्यात आणि केंद्र शासित राज्यात आहेत. बँकेची महाराष्ट्र, तामिळनाडू आणि ओडिसात शाखा आहेत. 

बँकेला जून तिमाहीमध्ये 48 करोड रुपयांचा तोटा 

सूर्योदय स्मॉल फाइनान्स बँकेला 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये 48 करोड रुपयांचा तोटा झाला आहे. कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे लघु वित्त बँकेला राइट-ऑफ, पुनर्रचनेची तरतूद आणि कमी वितरणामुळे हे नुकसान झाले. वर्षभरापूर्वीच्या तिमाहीत बँकेला 27 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

या व्यतिरिक्त, सध्या सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेत बचत खाते उघडल्यावर तुम्हाला 6.25 टक्के पर्यंत व्याज दर मिळेल. यामध्ये 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर वार्षिक 4 टक्के व्याज दिले जात आहे. 1 लाख ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 6.25 टक्के वार्षिक व्याज आहे. 10 लाखांपेक्षा जास्त ठेवींवर वार्षिक 6 टक्के व्याज मिळेल.