मुंबई : शेअर बाजारातील बिगबुल म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये पुन्हा रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर तसेच बॅंकिंग सेक्टरमधील शेअर सामिल केले आहेत. या शेअर्समध्ये येत्या दिवसांमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.
झुनझुनवाला यांनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये इंडियाबुल्स रिअल इस्टेट आणि फेडरल बँकेचे शेअर सामिल केले आहेत. झुनझुनवाला यांनी इंडियाबुल्स रिअल इस्टेटचे 50 लाख शेअर म्हणजेच 1.1 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. 22 ऑक्टोबरला ट्रेंडिंग सेशनदरम्यान गुंतवणूकीची वॅल्यु 82.6 कोटी रुपये होती.
इंडियाबुल्सच्या शेअरने 1 वर्षात 216 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 101 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली आहे. 22 ऑक्टोबर रोजी इंडियाबुल्सच्या शेअरचा भाव 162 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे.
बीएसईच्या वेबसाईटवर उपलब्ध सेलच्या सप्टेंबर 2021 तिमाहीच्या शेअर होल्डर पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला ऍंड असोशिएशनने फेडरल बँकेच्या शेअर्सची होल्डिंग 2.8 टक्क्यांनी वाढवली आहे. त्याच्या पत्नीची देखील होल्डिंग वाढून 1.01 टक्के झाली आहे.
फेडरल बँकेने 1 वर्षात 69 टक्क्यांचा रिटर्न दिला असून शेअरने 40 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. 22 ऑक्टोबरला कंपनीचा शेअर 95.50 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत होता.