हिमाचलमध्ये हिमवर्षाव, बद्रीनाथवर पांढरी चादर

गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवर्षावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाबा बद्रीनाथमध्येही मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे.

Updated: Nov 18, 2017, 05:20 PM IST
हिमाचलमध्ये हिमवर्षाव, बद्रीनाथवर पांढरी चादर title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. या हिमवर्षावामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाबा बद्रीनाथमध्येही मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत आहे.

रविवारी बाबा बद्रीनाथचं दार बंद होणार आहे आणि म्हणून या दिवशी येथे भक्त मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. सकाळी जेव्हा भक्तांनी डोळे उघडले तेव्हा मंदिराच्या भोवती हिमवर्षाव झालेला होता. हॉटेल आणि इतर स्थळे बर्फाखाली होत्या. हवामान थंड झाले होते.

पांढऱ्या चादरी प्रमाणे सर्व नजरेस पडत आहे. थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डोंगराळ भागात मोठ्य़ा प्रमाणात हिमवर्षाव होत आहे.