Shraddha Murder Case : लेकीबाबतची 'ती' गोष्ट आता का हवीय श्रध्दाच्या वडिलांना?

#shraddhamurdercase :  श्रद्धा खून प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने दिल्लीतील साकेत न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे. पोलिसांच्या चौकशीसाठी तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या (16 डिसेंबर) सुनावणी होणार आहे. 

Updated: Dec 16, 2022, 03:04 PM IST
Shraddha Murder Case : लेकीबाबतची 'ती' गोष्ट आता का हवीय श्रध्दाच्या वडिलांना? title=

Shraddha Murder Case update : देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण (shraddha Murder Case) सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. दिल्लीच्या श्रद्धा वायकरचा तिचा प्रियकर आफताब पुनावालाने गळा दाबून खून करत 35 तुकडे करुन त्याने फ्रिजमध्ये ठेवले होते. या हत्येनंतर रोज नवनव्या खुलासे दिल्ली पोलिसांना सापडत आहे. संपूर्ण देशाला हादरवुन टाकणाऱ्या दिल्लीच्या श्रध्दा वालकर प्रकरणात सध्या एक मोठी अपडेट समोर आली आहे.ती म्हणजे दोन वर्षापूर्वी श्रद्धाने वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. यात तक्रारीसंदर्भातील माहिती श्रद्धाच्या वडिलांना हवी आहे. पण ही माहिती श्रद्धाच्या वडिलांना नेमकी का हवीय?    

संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील (shraddha Murder Case) आरोपी आफताब पूनावाला न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान श्रद्धा हत्याकांडात श्रद्धाचा दोन वर्षापूर्वीच एक पत्र पोलिसांच्या हाती लागलं आहे. 2020 मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब (Aaftab Poonawala) ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिलीय. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटले आहे. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचे आहे. पोलिसात केलेली हिच तक्रार श्रद्धाच्या वडिलांना पाहिजे आहे.    

वाचा:  ती हाडं श्रद्धाची! श्रद्धा वालकर प्रकरणात मोठी अपडेट

 

श्रद्धा केससंदर्भात माहिती तिच्या वडिलांनी मागवली

2020 मध्ये माझ्या मुलीने दाखल केलेल्या तक्रारीबाबत मला काही माहिती हवी होती. म्हणून मी तशी याचिका दाखल केली आहे. भविष्यात केससाठी ती माहिती उपयुक्त ठरू शकते, असे मृत श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी सांगितले आहे. 

तसेच या हत्येनंतर श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर पत्रकार परिषदेत घेत म्हणाले, “माझी मुलगी श्रद्धा वालकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना अत्यंत दु:ख झालं आहे. हे दु:ख आम्ही कधीच विसरू शकणार नाही. माझी प्रकृती थोडी खराब असून मी शक्य होईल, तेवढंच तुमच्याशी बोलणार आहे. आतापर्यंत दिल्ली पोलीस व वसई पोलीस यांच्याकडून संयुक्त तपास व्यवस्थितपणे सुरू आहे.” अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली.