नवी दिल्ली : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील शीतयुद्धाचा परिणाम शुक्रवारी भारतासह आशिया खंडातील शेअर बाजारावर पाहायला मिळाला.
अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी उत्तर कोरियाने पॅसिफिक महासागरात हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची धमकी दिल्याचा प्रतिकूल परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
दोन्ही देशातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर स्थावर मालमत्ता क्षेत्रासह बँकिंग, वाहन उद्योग, एफएमजीसी इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने निर्देशांक गडगडले. त्यामुळे गुंतवणूकदाराचे यांत मोठं नुकसान झालंय.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 448 अंकांनी घसरुन 31 हजार 922 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 157 अंकांनी घसरला. शुक्रवारी भारतीय रुपयादेखील अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घसरला.