Saving electricity : विजेची बचत करायचीये तर या टिप्स वापरा...

save electricity : वीजेचं बिल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही करु शकतात.

पोपट पिटेकर | Updated: Oct 28, 2022, 11:35 PM IST
Saving electricity : विजेची बचत करायचीये तर या टिप्स वापरा... title=

मुंबई : महागाईचा सामना (Coping with inflation) सर्वांनाच करावा लागतोय. त्यात वाढीव येणार लाईट बिल (Increased light bill) हे मोठं डोके दु:खी आहे. परंतु तुम्हाला जर महागाईच्या काळात विजेची बचत (Saving electricity) करायची असेल, तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. येणा-या आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत आयात कोळशाच्या (Import Coal) किमती 45-55 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर (In the common man's pocket) होणार आहे

अशी वाचवा ऊर्जा

आपल्या घरातील ऊर्जा वाचवण्यासाठी (Save such energy) असे अनेक मार्ग आहेत. ज्याद्वारे आपण आपली ऊर्जा कमी प्रमाणात वापरु  शकतो. तुम्ही आधी घरात कोणती उपकरणे सर्वात जास्त उर्जा (most energy) वापरत आहेत हे समजून घ्या. त्यानंतर त्यांचा अनावश्यक वापर कमी करा. असं केल्यास नक्कीच तुमचं लाईट बिल कमी होऊन (reducing the light bill) तुमची बचत होईल.

हीटिंग थर्मोस्टॅट कमी करा

तुम्ही जर तुमच्या घरातील खोल्या उबदार ठेवण्यासाठी हीटर (Heater) वापरत असाल, (Lower the heating thermostat) तर त्यांचे तापमान कमी करून तुम्ही उर्जेचे बिल 4% प्रति डिग्रीने कमी करू शकता.

गरम पाण्याच्या टाक्या, पाईप इन्सुलेट करा

घरात गरम पाण्यासाठी वॉटर सिलेंडर जॅकेट (Water cylinder jacket for hot water) आणि पाईप लॅगिंग (Pipe Lagging) घ्या. ते खूप स्वस्त आहेत. त्यांचा वापर केल्याने तुमच्या गरजा लवकर पूर्ण होतील तसेच उर्जेची बचत (Saving energy) देखील होईल.

उपकरणे कार्यक्षमतेने वापरा

वॉशिंग मशिन (Washing machine) आणि डिशवॉशर्स (Dishwashers) मधील सायकलची संख्या कमी करण्यासाठी त्यांचा पूर्ण लोडवर वापर करा. असं केल्यास नक्कीत तुमच्या विजेची चांगली बचत (Saving good electricity) होईल.

गीजरचा कमी वापर

गीजरचा वापर कमी (Less use of geysers) केल्याने ऊर्जेची मोठा प्रमाणात बचत (Huge energy savings)होईल. अशा परिस्थितीत ऊर्जा बचतीसाठी त्यांचा योग्य वापर केल्यास बिलात काहीसा दिलासा मिळू शकतो. याशिवाय इतर अनेक छोटे-मोठे बदल करूनही तुम्ही वीज वाचवू (save electricity) शकता. आतापासूनच वीज बचतीची सवय लावली तर तुमचा चांगला फायदा होईल.