Rules Changes From 1st May: आजपासून नवे नियम लागू, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?

Rule Changes From 1st May: दर महिन्याला आर्थिक व्यवहाराच्या नियमांमध्ये मोठे बदल होताना (Financial Changes) दिसतात तेव्हा आता असेच काही बदल आजपासून होणार आहेत. जीएसटी, टॅक्स, वाहतूक, बॅंक अशा विविध स्तरावर काय बदल झाले आहेत. या लेखातून जाणून घ्या. 

गायत्री हसबनीस | Updated: May 1, 2023, 01:05 PM IST
Rules Changes From 1st May: आजपासून नवे नियम लागू, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम? title=

Rule Changes From 1st May: दर महिन्याला आपल्या आर्थिक व्यवहारांसाठीचे (Financial Rules Changes) नियम बदलतात. आजपासून 1 मे सुरू झाला आहे तेव्हा आपल्याला आजपासून या नियमांमध्ये होणारे बदल जाणून घेणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी आपला पगार (Salary) होतो आणि आपण आपली पहिली सर्व घरातील कामं ही पुर्ण करून घेतो. तेव्हा आजपासून तुमच्या आर्थिक व्यवहारांमध्ये वेगवेगळे बदल पाहायला मिळतील. जीएसटी, गॅस सिलेंडर, बॅंकेचे नवे नियम, पेट्रोल-डिझेल, लाईट बिल, पॅन कार्ड (Pan Card), आधार कार्ड (Adhaar Card), टॅक्स (Tax) आणि वाहतूक अशा अनेक व्यवहारांमध्ये या महिन्यापासून बदल होणार आहेत. तेव्हा या लेखातून सविस्तर जाणून घेऊया की हे बदल कोणते आणि तुमच्या खिशावर याचा कोणता आणि कसा परिणाम होणार आहे.

वाहतूक

आजपासून मेट्रोच्या भाड्यात (Mumbai Metro) 25 टक्क्यांची सूट मिळणार आहे. ही सूट 65 वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि विद्यार्थी म्हणजेच इयत्ता बारावी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रोच्या टिकीटांमध्ये 25 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि मुंबई मेट्रोपॉलिटियन रिजन डेव्हलमेंट अथॉरिटी यांच्या मेट्रो लाईन 2A आणि 7 तून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुम्हालाही सुविधा मिळेल. (rules changes from 1st may 2023 check the latest changes from gst to bank and tax rules)

जीएसटी 

तुम्ही जर का व्यावसायिक असाल आणि तुमची कोट्यवधींचा (GST Rule) उलाढाल होत असेल तर तुम्हाला मे महिन्यातील या जीएसटीच्या अपडेटबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही व्यावसायिक असाल आणि तुमच्या कंपनीची उलाढाल ही 100 कोटींहून अधिक असेल तर तुम्हाला तुमच्या जीएसटीच्या सर्व व्यवहाराची पावती ही इनव्हॉईस नोंदणी पोर्टलवर म्हणजे आयआरपीवर 7 दिवसांच्या म्हणजे आठवडाभराच्या आता अपलोड करावी लागणार आहे असं नाही केलंत तर त्याचा दंड तुम्हाला भरावा लागेल. 

हेही वाचा - 'Pathaan' नंतर 'Ponniyin Selvan 2' नं केला विक्रम! 100 कोटींचा गल्ला पार करत बॉक्स ऑफिस गाजवलं...

गॅस सिलेंडर 

गॅस सिलेंडरचे भाव हे गगनाला भिडले आहेत. त्यातून आपल्याला त्यासाठी (Gas Cylinder) अधिकीचे पैसे मोजावे लागत आहेत. मुंबईत गॅस सिलेंडरची किंमत ही 1980 रूपयांवरून 1808 रूपयांवर आली आहे. 

KYC 

केव्हायसीची सर्व कामं आपल्याला पुर्ण करणं अत्यंत गरजेचे असते. अन्यथा आपल्या बॅंकेच्या व्यवहारात अडथळा येतो. गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करताना जे ई-वॉलेट (E-Wallet) वापरतात त्याचे KYC पुर्ण आहे असं सुनिश्चित करण्यास सेबीकडून सूचना आली असून आजपासून हा नियम लागू झाला आहे. पॅन नंबर, फोन नंबर आणि बॅंकेचे डिटेल्स टाकून तुम्ही KYC चा फॉर्म भरू शकता.