रेल्वे उशीर झाल्यास प्रवाशांना तिकीट रक्कम परत मिळते, कशी? पाहा

रेल्वेच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांना ताटकळत रहावं लागतं.

Updated: Jul 14, 2021, 06:54 PM IST
रेल्वे उशीर झाल्यास प्रवाशांना तिकीट रक्कम परत मिळते, कशी? पाहा  title=

मुंबई : लांबच्या प्रवासासाठी अनेकदा रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे नवनवीन सुविधा देत असते. रेल्वे कुठे पोहचलीये, हे आपल्याल लाईव्ह लोकेशनद्वारेही पाहता येतं. रेल्वे सर्वच बाबतीत स्मार्ट झाली आहे, अपवाद वक्तशीरपणा. स्थानकावर रेल्वे दिलेल्या वेळेत आली, असं क्वचितच घडतं. कधी कधी तर रेल्वे तासंतास उशिरा असतात.  रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे प्रवाशांना ताटकळत रहावं लागतं. रेल्वेला उशिरा झाल्याने पुढील सर्वच नियोजन बिघडतं. परिणामी अनेकदा रेल्वे प्रवास रद्द करावा लागतो. पण रेल्वेला उशिर झाल्यानंतर रेल्वेकडून प्रवाशांना तिकीटाची रक्कम परत केली जाते. याबाबत अनेकांना माहिती नसते. (Railway refunds the full ticket fare if the train is late know details) 

रेल्वे प्रवाशांसाठी काही विशेषाधिकार असतात. या अंतर्गत तिकीटाचे पैसेही परत केले जातात. तिकीट रक्कम परत मिळवण्यासाठी काय करावं लागतं, याबाबत आपण जाणून घेऊयात. रेल्वेच्या नियमांनुसार, जर रेल्वे  3 किंवा त्यापेक्षा अधिक वेळ उशिरा असेल, तर तुम्हाला तिकीटाची रक्कम परत मिळू शकते.

अशी आहे प्रक्रिया....

रेल्वेला 3 किंवा त्यापेक्षा अधिक उशिर झाल्यास, त्याच स्टेशनवरील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट रद्द करुन रक्कम परत मिळवू शकता. जर तुम्ही तिकीट ऑनलाईन बूक केली असेल तर, त्यासाठी ऑनलाईन टीडीआर फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमचे तिकीटाची निम्मी रक्कम परत केली जाते. तर उर्वरित रक्कम ही काही तासानंतर देण्यात येते.