२०१८ मध्ये घरासाठी मिळेल ४ लाखांपर्यंतची सूट

 तुमचे घर तुम्हाला ३ ते ४ लाखापर्यंत स्वस्त मिळणार आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Jan 6, 2018, 02:47 PM IST
२०१८ मध्ये घरासाठी मिळेल ४ लाखांपर्यंतची सूट  title=

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर घेणाऱ्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. घर खरेदी करणाऱ्यांना होम लोनच्या व्याजावर सबसिडी मिळणार आहे. ईडब्‍ल्‍यूएस, एलआईजी और एमआईजीवर ३१ मार्च २०१९ पर्यंत सबसिडी दिली जाणार आहे. त्यामूळे तुमचे घर तुम्हाला ३ ते ४ लाखापर्यंत स्वस्त मिळणार आहे. 

३ लाखाहून कमी उत्पन्न 

जर तुमचे वार्षिक उत्पन्न ३ लाखाहून कमी असणाऱ्यांना ३० वर्ग मीटर कारपेट आकाराचे घर घेता येऊ शकते. यावर ६.५ टक्के सबसिडी मिळू शकते. 

६ लाखाहून कमी उत्पन्न 

६ लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असल्यास ६० वर्ग मीटर कारपेट असलेला फ्लॅट खरेदी करु शकता.  यातील होम लोनवर तुम्हाला ६.५ टक्के सबसिडी मिळेल. 

१२ लाखाहून कमी उत्पन्न

जर तुमचे वार्षिक उत्पन्न ६ लाखाहून अधिक आणि १२ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही एमआयजी कॅटगरीमध्ये असाल. यानुसार १२९० स्क्वेअर फूट घर घेण्यावर तुम्हाला सबसिडी मिळेल. कारपेट साईजवर हा फायदा मिळतो. या आकारात २ ते ३ बीएचकेचे फ्लॅट मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या कॅटगरी वाल्यांना ४ टक्के सुट मिळते. 

१८ लाखाहून कमी वार्षिक 

जर तुमचे वार्षिक उत्पन्न १२ लाखाहून अधिक आणि १८ लाखाहून कमी असेल तर तुम्ही एमआयजी-२ या कॅटगरीत मोडता. या साईजमध्ये ३ बीएचकेवाले फ्लॅट उपलब्ध आहेत. या कॅटगरीसाठी ३ टक्के व्याज मिळणार आहे. 

नियम आणि अटी 

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सबसिडीला क्रेडिट लिंक्‍ड सब्सिडी स्‍कीम (सी.एल.एस.एस.) म्हटले जाते. हाऊसिंग फायनांस कंपन्यादेखील इतर बॅंकाप्रमाणेच लोन देत आहेत. 

तुमच्या वार्षिक उत्पन्नानुसार फ्लॅट किंवा प्रोजेक्ट निवडल्यानंतर तुम्हाला बॅंकेशी संपर्क करावा लागेल. 

तुम्हाला या स्किमचा फायदा होणार आहे का ? याची बॅंक अधिकाऱ्याकडून माहिती घ्या. 

अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवल्यावरच बॅंकेत लोनसाठी अप्लाय करु शकता. 

तसेच तुमच्या परिवारीतील सदस्याच्यानावे कोणते अन्य घर नसल्याचे तुम्हाला एफिडेविट द्यावे लागेल.