मुंबई : गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय म्हणजे (Post Office Scheme) पोस्ट स्कीम. पोस्टाकडून ग्राहकांसाठी नवनवीन योजना आणल्या जातात. त्यापैकी आम्ही तुम्हाला एका अफलातून योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेद्वारे तुम्हाला 35 लाख रुपयांचा लाभ होऊ शकतो. (post office customers you will get benefit of 35 lakhs on depositing only 1500 rupees know details)
ग्राम सुरक्षा ही योजना गूंतवणुकीसाठी (Gram Suraksha Scheme) सर्वोत्तम आहे. यातून गुंतवूकदारांना चांगला फायदा होऊ शकतो.
पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही एक प्रकारची विमा योजना आहे. ज्यामध्ये दरमहा केवळ 1500 रुपये गुंतवावे लागतील आणि त्या बदल्यात 35 लाख मिळतील.
ही पोस्ट ऑफिसची सरकारी विमा योजना आहे. 19 ते 55 या वयोगटातील कोणीही गुंतवणूक करु शकतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम ही 10 हजार रुपये आहे.
या व्यतिरिक्त जर जास्तीत जास्त रक्कमेची मर्यादा ही 10 लाख इतकी आहे. या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर प्रीमियमची रक्कम भरण्याची सोय आहे.
वयाच्या 19 व्या वर्षापासून या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली तर मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल.