मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-diesel Rate) सर्वाधिक दरांवर पोहोचसं आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. विविध राजकीय पक्षांसह सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. आता दिग्गज जागतिक वित्तीय कंपनी गोल्डमन सॅक्सने म्हटले आहे की, आगामी काळात देशात पेट्रोलचे दर 150 रुपयांपर्यंत पोहोचतील, (Petorl and diesel news)
ब्रेंट क्रूड महाग झाल्याने किंमत वाढणार
गोल्डमन सॅक्सने नुकत्याच दिलेल्या एका नोटमध्ये म्हटले आहे की, पुढील वर्षापर्यंत ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल $110 पर्यंत वाढू शकते. सध्या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $85 च्या आसपास आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीच्या तुलनेत पुढील वर्षी ब्रेंट क्रूडच्या किमती 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. गोल्डमन सॅक्समधील तेल विश्लेषक म्हणतात की, जागतिक मागणी-पुरवठा असंतुलित झाला आहे. यावेळी क्रूडची मागणी वाढली आहे. यामुळे पुढील वर्षी क्रूडच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही मोठा परिणाम होणार आहे. गोल्डमन सॅक्सचे म्हणणे आहे की क्रूडच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे भारतात पेट्रोलचे दर प्रति लिटर 150 रुपये आणि डिझेलचे दर 140 रुपयांनी वाढू शकतात. सध्या राजधानी दिल्लीत 1 लिटर पेट्रोलचा दर 107.94 रुपये आणि डिझेलचा दर 96.97 रुपये प्रति लिटर आहे.
क्रूडची मागणी वाढणार
गोल्डमन सॅक्सने अंदाज व्यक्त केला आहे की, जागतिक क्रूडची मागणी दररोज 99 दशलक्ष बॅरल ओलांडत आहे. लवकरच ते दररोज 100 दशलक्ष बॅरल्सची पातळी ओलांडू शकतात. याचे कारण म्हणजे आशियातील बहुतेक देश कोरोनाच्या डेल्टा प्रकारातून सावरत आहेत.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. सरकारी मालकीच्या तेल कंपन्या इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांनी बुधवारी 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35-35 पैशांनी वाढ केली आहे. या वाढीसह दिल्लीत पेट्रोलचा दर 107.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. त्याचवेळी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 113.45 रुपये आणि डिझेल 104.75 रुपये प्रतिलिटरने मिळत आहे.