बंगळुरू : दक्षिणपंथी संगठन श्री राम सेनेने (Shree Ram Sena) व्हॅलेंटाईन डेचा विरोध केला आहे. व्हॅलेंटाईन ऐवजी श्री राम सेना 'पालकांचा पूजा दिन' साजरा करणार असल्याची माहिती त्यांनी शनिवारी दिली. एवढचं नाही तर कर्नाटकच्या वेगवेगळ्या भागात संघटना आपले सदस्य तैनात करणार आहेत. असं देखील संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईनच्या दिवशी गैरप्रकार रोखण्यासाठी ठिक-ठिकाणी संस्थेचे सदस्य तैनात असणार आहेत.
संस्थेचे प्रमुख प्रमोद मुतालिक म्हणाले की दरवर्षी आम्ही राज्यभरात व्हॅलेंटाईनच्या दिवशी 'पालकांची पूजा' आयोजित करतो. यंदाच्या वर्षी देखील जवळपास 60 ठिकाणी 'पालकांची पूजा' कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. दरम्यान पब (Pub), बार (Bars), मॉल (Malls), आइसक्रीम पॉर्लर (Ice Cream Parlor) ठिकाणी संस्थेचे सदस्य नजर ठेवून असणार आहेत.
संघटनेचे सदस्य कायदा आपल्या हातात घेणार नसून ते पोलिसांसोबत काम करणार असल्याचं देखील संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईन डे संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रेत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करतो.
पण व्हॅलेंटाईन ही पाश्चिमात्य संस्कृती आहे आणि आताच्या तरूणांची पाऊले या पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत असून आपली अमुल्य संस्कृतीचा आजच्या पिढीला विसर पडत आहे. असं वक्तव्य श्री राम सेनेच्या हुब्बली इकाई यांनी केलं.
मादक द्रव्यांचा गैरवापर, सेक्स आणि लव्ह जिहाद इत्यादींचा ट्रेन्ड वाढत आहे जो स्वीकारार्ह नाही. संघटनेचे विधान समोर आल्यावर बेंगळुरू पोलीसही सतर्क झाले आहेत. दरम्यान, आम्ही कोणालाही हा कायदा आपल्या हातात घेऊ देणार नाही. जर कोणाकडे तक्रार असेल तर ती आमच्याकडे या. असं बेंगळुरूचे पोलिस आयुक्त कमल पंत यांनी सांगितलं आहे.