Obscene MMS Viral : भारतातील मोठं आणि महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेश. या आधीही उत्तर प्रदेशातील पोलिसांवर अनेक गंभीर आरोप लागले आहेत. कधी गुन्हेगारांना संरक्षण देणं, तर कधी खंडणी, अशा प्रकारचे गंभीर आरोप उत्तर प्रदेशातील पोलिसांवर लागल्याचं आपण पाहिलंय, वाचलंय. आता उत्तर प्रदेशातील एका पोलिसावर महिलेसोबत अश्लील कृत्य केल्याचे आरोप लागलेले आहेत. उत्तर प्रदेशातील एका पोलिसांचा महिलेसोबतचा अश्लील व्हिडीओ समोर आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हा पोलीस पती आणि पत्नीचं भांडण मिटवण्यासाठी गेला होता. अशातच या शिपायाने त्या महिलेसोबत गैरकृत्य केल्याचं बोललं जातंय. आता या पोलिसाचा आणि महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये हा पोलीस शिपाई महिलेसोबत अश्लील कृत्य करताना पाहायला मिळतोय. दरम्यान, हा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांची छबी धुळीला मिळवणाऱ्या या शिपायाला निलंबित करण्यात आलं आहे. पोलीस या महिलेबाबतची माहिती शोधण्याचं काम करतायत.
9 सेकंदांचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार एका बंदिस्त खोलीत एका महिलेसोबत अश्लील कृत्य करताना पाहायला मिळतो. सदर कृत्याची नोंद घेत सुप्रिटेंडन्ट पोलीस दिनेश त्रिपाठी यांनी या पोलिसाला निलंबित केले आहे. स्वतः पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ दोन वर्षे जुना असल्याचं सांगितलं जातंय.
आरोपी पोलीस हवालदार तेंव्हा गंगा घाट याठिकाणी तैनात होता. काही महिन्यानंतर त्याची उन्नाव येथून बंगरमाऊ येथे बदली झाली. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. यानंतर पोलीस महिलेचा शोध घेत होते.
Obscene mms of UP police with unknown women goes viral UP police responds