नवी दिल्ली : देशातील बहुतांश बॅंकांमध्ये अकाऊंट मेंटनेंससाठी कमीक कमी ठराविक रक्कम असणे गरजेचे असते. हा बऱ्याच ग्राहकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरतो. पण देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) ने सेविंग अकाऊंट सुरु केले आहे. या नव्या अकाऊंटनुसार अकाऊंट होल्डरला अन्य सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. एसबीआय कडून मिळालेल्या माहितीनुसार बेसिक सेविंग बॅंक डिपॉझिट अकाऊंट (BSBD) वर मिनिमम बॅलेंसची अट नसेल.
SBI आणि BSBD अकाऊंट इतर खात्यांप्रमाणेच सहज उघडता येते. अन्य खात्यांप्रमाणे या खात्यातही KYC नियमांची पूर्तता होणे गरजेचे आहे. यामध्ये सिंगल किंवा जॉईंट अकाऊंट खोलता येऊ शकते. स्टेट बॅंकेच्या देशातील कोणत्याही शाखेत हे खाते तुम्ही खोलू शकता.
यामध्ये मिनिमम किंवा मॅक्सिमम बॅलेंस ही अट नाही.
स्टेट बॅंकच्या इतर बचत खात्यांप्रमाणेच इथेही व्याजदर मिळतो.
रुपे डेबिट कार्ड आणि नेट बॅंकिंगची सुविधा या खात्यावरही उपलब्ध
Basic Savings Bank Deposit Account is to encourage individuals to save their income w/o requiring to pay any charges https://t.co/PEbjj63Ts3 pic.twitter.com/uXiMiulfoL
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 1, 2017
हे खाते खोलण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अट आहे. ग्राहकाचे दुसरे कोणतेही सेविंग अकाऊंट असता कामा नये. जर कोणते सेव्हिंग किंवा बचत खाते असेल तर त्यांनी ते ४ आठवड्यात बंद करायला हवे.